25 C
Mumbai
Saturday, January 31, 2026
घरक्राईमनामाअमली पदार्थासह एकाला माहीम मधून अटक, ५४ लाखाचे ब्राऊन शुगर जप्त

अमली पदार्थासह एकाला माहीम मधून अटक, ५४ लाखाचे ब्राऊन शुगर जप्त

Google News Follow

Related

अमली पदार्थाच्या डिलिव्हरीसाठी आलेल्या उत्तराखंड राज्यातील एका तरुणाला माहीम येथून अटक करण्यात आली आहे. शाहू नगर पोलिसांनी केलेल्या कारवाईत या तरुणांकडून ५४ लाख रुपये किंमतीचा ब्राऊन शुगर हा अमली पदार्थ जप्त करण्यात आला आहे.

सरफराज अब्दुल मस्जिद अहमद (२६) असे अटक करण्यात आलेल्या या तरुणाचे नाव आहे. सरफराज हा मूळचा उत्तराखंड राज्यात राहणारा असून सध्या तो वसईतील नायगाव येथे राहण्यास आहे.

एक जण अमली पदार्थाची डिलिव्हरी करण्यासाठी माहीम सायन लिंक रोड येथे येणार असल्याची माहिती शाहू नगर पोलीस ठाण्याचे दहशतवाद विरोधी सेलचे सपोनि.सतेज म्हस्के यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे सपोनि. म्हस्के यांनी वरिष्ठ पोलिस निरीक्षक जितेंद्र कांबळे, पोनि. शिरसाठ यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या पथकासह रविवारी दुपारी सायन माहीम लिंक रोड येथे सापळा रचून सरफराज याला ताब्यात घेऊन त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे ब्राऊन शुगर हा अमली पदार्थ सापडला.

हे ही वाचा:

श्री ४२० तिहारमध्ये रामलीला मैदानावरील कीर्तन अगदीच वाया…

तोशखाना भ्रष्टाचार प्रकरणामध्ये इम्रान खान यांच्या शिक्षेला स्थगिती

मयंक यादवचे जगभरातून होतेय कौतुक

ज्ञानवापी मशिदीच्या व्यास तळघरात पूजा सुरू राहणार!

 

शाहू नगर पोलिसांनी सरफराज अब्दुल मस्जिद अहमद (२६) या तरुणाला अटक करून त्याच्याकडून २७०ग्रॅम हेरॉईन (ब्राऊन शुगर) हा अमली पदार्थ जप्त केला आहे. त्याच्याकडून जप्त करण्यात आलेल्या ब्राऊन शुगरची किंमत ५४ लाख रुपये असल्याची माहिती शाहू नगर पोलीस ठाण्याचे वपोनि. जितेंद्र कांबळे यांनी दिली.

सरफराज हा मूळचा उत्तराखंड राज्यात राहणारा असून सध्या तो वसईतील नायगाव येथे एकटा राहण्यास असून वसईत यापूर्वी त्याच्यावर अमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे. सरफराज याने उत्तराखंड येथील एका डोंगराळ भागातून हेरॉइन आणून मुंबईत त्याचा पुरवठा करीत असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
289,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा