29 C
Mumbai
Saturday, September 26, 2026
घरक्राईमनामाबेकरीचा व्यवसाय सुरू ठेवण्यासाठी लाच मागणारा लोकसेवक गजाआड

बेकरीचा व्यवसाय सुरू ठेवण्यासाठी लाच मागणारा लोकसेवक गजाआड

लाचलुचपत विभागाची कारवाई

Google News Follow

Related

- Advertisement -National Stock Exchange

एका तक्रारदाराला बेकरीचा व्यवसाय चालू ठेवायचा असल्यास आणि त्यांचे व्यवसायावर कोणतीही कारवाई न करण्याकरिता लोकसेवक विजय पाटील यांनी तक्रारदाराकडे स्वतः करिता व लोकसेवक निरवकुमार जैसूर यांचे करिता रु. ७० हजार लाचेची मागणी केली. तक्रारदार यांना लाच देणेची इच्छा नसल्याने त्यांनी लोकसेवक यांच्याविरुद्ध २ सप्टेंबरला लाचलूचपत प्रतिबंधक विभाग, मुंबईकडे तक्रार दिली.

२ सप्टेंबर रोजी पडताळणी दरम्यान तक्रारदार यांचेकडे आरोपी लोकसेवक विजय पाटील यांनी रू.७० हजार लाचेची मागणी करून तक्रारदार यांना त्यांचे वरिष्ठ अधिकारी लोकसेवक दुय्यम अभियंता निरवकुमार जैसूर यांची भेट घालून दिली असता लोकसेवक निरवकुमार जैसूर यांनी तक्रारदार यांचे कडे तडजोडी अंती रु. ६० हजार इतक्या लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले.
हे ही वाचा:
धोनीसाठी ‘इम्पॅक्ट प्लेअर’ची भूमिका योग्य

महाराष्ट्रातील या मतदारसंघातून तब्बल ८५ टक्के मतदारांची नावे वगळली

नेपाळमध्ये जलप्रलयातील मृतांचा आकडा १,२७० पार

GSLV-F17 चे काउंटडाऊन सुरू; भारताचा पहिला जिओ-इमेजिंग उपग्रह झेपावणार

२ सप्टेंबरला सापळा कारवाई दरम्यान लोकसेवक विजय पाटील यांना तक्रारदार यांचेकडून ६० हजार लाच घेताना के / पश्चिम वॉर्ड ऑफिस, तळमजला लीफ्टजवळ रंगेहाथ पकडण्यात आले आहे. तसेच निरवकुमार जैसूर यांना सहावा मजला त्यांचे कार्यालय येथून ताब्यात घेण्यात आले.

आरोपीची अंगझडती /कार्यालयाची झडती / बॅग झडती घेतल्यावर आरोपी लोकसेवक निरवकुमार जैसूर यांच्या अंगझडती दरम्यान दोन मोबाईल जप्त करण्यात आले आहे. आरोपी लोकसेवक पाटील यांचे अंगझडती दरम्यान एक मोबाईल व रोख रक्कम रु ४०८२० तसेच सॅगमध्ये रु. २ लाख ३७,६०० रोख रक्कम मिळाली. मोबाईल फोन जप्त करण्यात आला आहे.

या कारवाईत सापळा अधिकारी
पो.नि. अनिल चित्तरवाड, पर्यवेक्षक अधिकारी स.पो.आ. गंगाप्रसाद मुदिराज, पो.ह. मठपती, पो.ह. गावडे, सोनोने, म.पो.ह.पाटील, म.पो.शि. गवांदे, पो.शि.वाईगडे, स. फौ.चा.फटांगरे, पो.शि.चा. दुधाळ, मार्गदर्शन : संदिप दिवाण, अपर. पोलीस आयुक्त, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, मुंबई, घेरडीकर, अपर पोलीस उप आयुक्त(१), लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, मुंबई, अनंत साळुंखे, अपर पोलीस उप आयुक्त(२), लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, मुंबई यांनी महत्त्वाची जबाबदारी पार पाडली.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
335,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा