29.2 C
Mumbai
Thursday, October 15, 2026
घरक्राईमनामाझुरिच-दिल्ली फ्लाइटपूर्वी अल्कोहोल टेस्ट पॉझिटिव्ह आलेला वैमानिक निलंबित

झुरिच-दिल्ली फ्लाइटपूर्वी अल्कोहोल टेस्ट पॉझिटिव्ह आलेला वैमानिक निलंबित

एअर इंडियाच्या वैमानिकावर कारवाई

Google News Follow

Related

एअर इंडियाच्या झुरिच- दिल्ली विमानाच्या उड्डाणापूर्वी एका वैमानिकाची अल्कोहोल टेस्ट पॉझिटिव्ह आल्याने त्याच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. ६ सप्टेंबर रोजी झुरिच विमानतळावर ही घटना घडली होती. संबंधित वैमानिकाला विमान उड्डाण करण्यापूर्वीच विमानातून उतरवण्यात आले.

माहितीनुसार, झुरिच विमानतळावरील ग्राउंड हँडलिंग कर्मचाऱ्यांना वैमानिकाकडून अल्कोहोलचा वास येत असल्याचे जाणवले. त्यानंतर अधिकाऱ्यांना माहिती देण्यात आली. वैमानिकाची तपासणी करण्यात आली असता त्याच्या रक्तातील अल्कोहोलचे प्रमाण निर्धारित मर्यादेपेक्षा अधिक असल्याचे आढळले. त्यामुळे झुरिचहून दिल्लीला जाणारे एआय-१५१ हे विमान नियोजित वेळापत्रकानुसार उड्डाण करू शकले नाही.

या प्रकरणाची माहिती स्वित्झर्लंडच्या फेडरल ऑफिस ऑफ सिव्हिल एव्हिएशनने (FOCA) भारताच्या नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाला (DGCA) दिली आहे. स्विस विमान वाहतूक अधिकाऱ्यांनी संबंधित वैमानिकाविरोधात स्थानिक नियमांनुसार कारवाई केली असून, पुढील नियामक प्रक्रिया DGCAकडून केली जाणार आहे.

हे ही वाचा:

राहुल गांधींना आरसा दाखवणारा चेन्निथलांचा जुना व्हीडिओ व्हायरल

इराणमधील आंदोलक जुळ्या मुली तुरुंगात… चेहरे सुजलेले, केस उपटून काढलेले, हाडे मोडलेली!

मोबाइलपासून संरक्षण क्षेत्रापर्यंत; १२ वर्षांत ‘मेक इन इंडिया’ची मोठी भरारी

शेवटच्या क्षणी जोडी बदलली अन् भारताला नेमबाजीत सुवर्ण!

एअर इंडियाकडून सुरक्षा आणि नियामक नियमांच्या उल्लंघनाबाबत शून्य-सहिष्णुतेचे धोरण असल्याचे सांगण्यात आले आहे. विमान कर्मचाऱ्यांकडून नियमांचे उल्लंघन झाल्याचे निश्चित झाल्यास संबंधितांवर कंपनीच्या धोरणानुसार आणि लागू नियमांनुसार कारवाई केली जाते. दरम्यान, एअर इंडियाच्या आणखी एका वैमानिकाची अमली पदार्थासंदर्भातील चाचणी पॉझिटिव्ह आल्याच्या घटनेनंतर काही दिवसांतच ही घटना समोर आली आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
338,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा