34 C
Mumbai
Thursday, October 1, 2026
घरविशेषमोबाइलपासून संरक्षण क्षेत्रापर्यंत; १२ वर्षांत ‘मेक इन इंडिया’ची मोठी भरारी

मोबाइलपासून संरक्षण क्षेत्रापर्यंत; १२ वर्षांत ‘मेक इन इंडिया’ची मोठी भरारी

२५ सप्टेंबर २०१४ रोजी झाली होती सुरुवात

Google News Follow

Related

पंतप्रधान मोदी यांचा महत्त्वाकांक्षी उपक्रम ‘मेक इन इंडिया’ला आज (२५ सप्टेंबर) १२ वर्षे पूर्ण झाली. या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील उत्पादन, गुंतवणूक आणि निर्यात क्षेत्रातील वाढीचा उल्लेख करत या बदलाचे परिणाम विविध क्षेत्रांत दिसून येत असल्याचे म्हटले. २५ सप्टेंबर २०१४ रोजी ‘मेक इन इंडिया’ उपक्रमाची सुरुवात करण्यात आली होती.

पंतप्रधान मोदी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर पोस्ट करत “अधिक उत्पादन भारतात, अधिक गुंतवणूक भारतात आणि अधिक निर्यात भारतातून. विविध क्षेत्रांत हा बदल दिसून येत आहे,” असे म्हटले. ‘मेक इन इंडिया’चा उद्देश देशातील उत्पादन व्यवस्था मजबूत करणे, गुंतवणुकीला चालना देणे तसेच भारताला उत्पादन, डिझाइन आणि नवोन्मेषाचे जागतिक केंद्र बनवणे हा होता. सध्या ‘मेक इन इंडिया 2.0’ अंतर्गत उत्पादन आणि सेवा क्षेत्रातील एकूण २७ क्षेत्रांचा समावेश आहे.

सरकारी आकडेवारीनुसार, ३१ मार्च २०२६ पर्यंत उत्पादनाशी संबंधित प्रोत्साहन अर्थात PLI योजनांमधून सुमारे २.४० लाख कोटी रुपयांची प्रत्यक्ष गुंतवणूक झाली आहे. या योजनांमुळे सुमारे २३.८ लाख कोटी रुपयांचे उत्पादन आणि विक्री, तर सुमारे १५.२ लाख कोटी रुपयांची निर्यात झाल्याचे सरकारच्या आकडेवारीत नमूद करण्यात आले आहे. या योजनांमधून १४.६ लाखांहून अधिक प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार निर्माण झाल्याचेही सांगण्यात आले आहे.

गेल्या १२ वर्षांत इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन क्षेत्रात मोठी वाढ झाल्याचे सरकारी आकडेवारीतून दिसते. २०१४-१५ मध्ये भारतातील इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनाचे मूल्य सुमारे १.९ लाख कोटी रुपये होते. २०२५-२६ मध्ये ते वाढून अंदाजे १३.११ लाख कोटी रुपये झाले आहे. मोबाइल फोन उत्पादनातही मोठी वाढ झाली आहे. २०१४-१५ मध्ये सुमारे १८ हजार कोटी रुपयांचे मोबाइल फोन उत्पादन झाले होते. २०२५-२६ मध्ये हे उत्पादन वाढून सुमारे ६.२७ लाख कोटी रुपयांवर पोहोचले. उत्पादनाच्या प्रमाणाच्या दृष्टीने भारत सध्या जगातील दुसरा सर्वात मोठा मोबाइल फोन उत्पादक असल्याचे सरकारने म्हटले आहे.

हे ही वाचा:

शेवटच्या क्षणी जोडी बदलली अन् भारताला नेमबाजीत सुवर्ण!

“पेजर आठवतात का?” नेतन्याहूंनी पेजर दाखवत हिजबुल्लाहला विचारला प्रश्न

साहिल आत्महत्या प्रकरणात लॉक आयफोन ठरतोय अडथळा

महिलेचा मॉर्फ फोटो वापरल्याप्रकरणी दिपके चौकडीवर गुन्हा

‘मेक इन इंडिया’चा विस्तार संरक्षण उत्पादन क्षेत्रातही झाल्याचे सरकारच्या आकडेवारीतून समोर आले आहे. २०१४-१५ मध्ये देशातील संरक्षण उत्पादनाचे मूल्य ४६,४२९ कोटी रुपये होते. २०२५-२६ मध्ये ते वाढून विक्रमी १.७८ लाख कोटी रुपये झाले. दरम्यान, केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री पीयूष गोयल यांनी ‘मेक इन इंडिया’मुळे भारताची उत्पादन क्षमता केवळ देशांतर्गत गरजा पूर्ण करण्यापुरती मर्यादित न राहता जागतिक बाजारपेठेसाठी उत्पादन करण्याच्या दिशेने पुढे गेल्याचे म्हटले. पुढील टप्प्यात भारताला जागतिक उत्पादन केंद्र म्हणून अधिक मजबूत करण्यावर भर राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
335,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा