31 C
Mumbai
Monday, October 12, 2026
घरराजकारण"पुढच्या निवडणुका ईव्हीएम वर नकोत; बॅलेट पेपरवर घ्या"

“पुढच्या निवडणुका ईव्हीएम वर नकोत; बॅलेट पेपरवर घ्या”

राज ठाकरेंचे सर्वपक्षीय आंदोलनाचे आवाहन

Google News Follow

Related

मतदारयादीच्या विशेष सखोल पडताळणी अर्थात एसआयआर प्रक्रियेवरून देशातील राजकीय वातावरण तापले असतानाच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी निवडणूक प्रक्रियेबाबत मोठी मागणी केली आहे. यापुढील सर्व निवडणुका ईव्हीएमवर न घेता पुन्हा बॅलेट पेपरवर घेण्यात याव्यात, यासाठी देशातील सर्व राजकीय पक्षांनी एकत्र येऊन मोठे आंदोलन उभे करावे, असे आवाहन राज ठाकरे यांनी केले आहे. त्यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे ही भूमिका मांडताना मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या कार्यपद्धतीवरही प्रश्न उपस्थित केले आहेत.

एसआयआर प्रक्रियेत कथित गैरप्रकार झाल्याचा आरोप करत राज ठाकरे यांनी ही संपूर्ण प्रक्रिया रद्द करून त्याची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी केली आहे. एसआयआरमध्ये नेमके काय घडले, यावर निवडणूक आयोगातीलच चर्चांमुळे प्रश्न निर्माण होत असल्याचा दावा त्यांनी केला. त्यामुळे सध्याची प्रक्रिया पूर्णपणे रद्द करून नव्याने एसआयआर राबवावी, अशी मागणी मनसेने केल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या मुद्द्यावर देशातील सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येण्याची गरज असल्याचेही राज ठाकरे यांनी म्हटले आहे.
हे ही वाचा: 

मोबाइलपासून संरक्षण क्षेत्रापर्यंत; १२ वर्षांत ‘मेक इन इंडिया’ची मोठी भरारी

शेवटच्या क्षणी जोडी बदलली अन् भारताला नेमबाजीत सुवर्ण!

“पेजर आठवतात का?” नेतन्याहूंनी पेजर दाखवत हिजबुल्लाहला विचारला प्रश्न

साहिल आत्महत्या प्रकरणात लॉक आयफोन ठरतोय अडथळा
दरम्यान, राज ठाकरे यांनी ज्ञानेश कुमार यांच्यावरही थेट टीका केली आहे. एसआयआरचा वापर सत्ताधाऱ्यांच्या फायद्यासाठी केला जात असल्याचा आरोप त्यांनी आपल्या पोस्टमधून केला. त्यांच्या मते, निवडणूक प्रक्रियेबाबत निर्माण झालेल्या प्रश्नांवर विरोधी पक्षांनी स्वतंत्रपणे भूमिका घेण्यापेक्षा एकत्रितपणे आवाज उठवण्याची आवश्यकता आहे. त्यातूनच निवडणूक प्रक्रियेवरील जनतेचा विश्वास आणि पारदर्शकतेचा मुद्दा प्रभावीपणे मांडता येईल, अशी त्यांची भूमिका आहे.

या पार्श्वभूमीवर ईव्हीएमऐवजी बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्याचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. राज ठाकरे यांनी सर्व पक्षांनी एकत्र येऊन आंदोलन उभारण्याचे आवाहन केल्याने या विषयावर विरोधकांची पुढील भूमिका काय असेल, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. दुसरीकडे, निवडणूक आयोगातील आयुक्तांमधील मतभेद हे लोकशाही प्रक्रियेचा भाग असल्याचे भाजप नेते मुख्तार अब्बास नक्वी यांनी म्हटले आहे. त्यामुळे एसआयआर, निवडणूक आयोगाची कार्यपद्धती आणि ईव्हीएम विरुद्ध बॅलेट पेपर या मुद्द्यांवरून राजकीय संघर्ष आणखी तीव्र होण्याची चिन्हे आहेत.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
337,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा