29 C
Mumbai
Thursday, September 24, 2026
घरक्राईमनामा३५० कोटींच्या सायबर फसवणुकीचा पर्दाफाश

३५० कोटींच्या सायबर फसवणुकीचा पर्दाफाश

गुन्हे शाखेकडून तिघांना अटक

Google News Follow

Related

- Advertisement -National Stock Exchange

मुंबई : ऑनलाइन सायबर फसवणूक करणाऱ्या टोळीविरोधात मुंबई गुन्हे शाखेच्या युनिट-५ ने मोठी कारवाई करत तीन आरोपींना अटक केली आहे. तब्बल ३५० कोटी रुपयांपेक्षा अधिक रकमेच्या फसवणुकीशी संबंधित या प्रकरणातील आरोपींना न्यायालयाने १९ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलिसांच्या तपासानुसार, आरोपींनी विविध बँकांमध्ये स्वतःच्या तसेच इतर व्यक्तींच्या नावाने अनेक बँक खाती उघडली होती. या खात्यांना मोठ्या संख्येने मोबाइल सिमकार्ड जोडण्यात आले होते. ऑनलाइन सायबर फसवणुकीतून मिळणारी रक्कम या खात्यांमध्ये जमा केल्यानंतर ती अन्य बँक खात्यांमध्ये वळवली जात होती.

कारवाई दरम्यान पोलिसांनी आरोपींकडून ८८ पासबुक, १४३ चेकबुक, तब्बल ९०० एटीएम कार्ड, २४ मोबाइल फोन, १६७ सिमकार्ड आणि दोन लॅपटॉप जप्त केले आहेत. तपासात आरोपींनी सुमारे १० बँक खात्यांच्या माध्यमातून २४ कोटी रुपयांच्या सायबर फसवणुकीच्या रकमेचे व्यवहार केल्याचे समोर आले आहे. या खात्यांशी संबंधित सायबर पोर्टलवरील १,९३० रेकॉर्डमध्ये ३२ तक्रारी आढळून आल्या आहेत. तसेच तांत्रिक तपासात आरोपींकडून वापरण्यात आलेल्या २८८ सिमकार्डचा सायबर फसवणुकीशी संबंध असल्याचे निष्पन्न झाले आहे.
हे ही वाचा:
भारतात आयफोन डुओची किंमत तब्बल ३ लाखांवर

होर्मुझनंतर बाब-अल-मंदेब समुद्रधुनीही धोक्यात

मुजाहिद्दीनच्या फरार दहशतवाद्याच्या मुलीला मुंब्र्यातून अटक

मोदी-पुतिन यांची पुन्हा कार डिप्लोमसी; ‘फोर्ट्रेस ऑन व्हील्स’मधून प्रवास

या नेटवर्कशी संबंधित प्रकरणांमध्ये ओटीपी फसवणूक, डिजिटल अटक, नोकरीच्या नावाखाली फसवणूक आणि गुंतवणूक फसवणूक अशा विविध प्रकारांचा समावेश असल्याचे पोलिसांनी सांगितले. अटक केलेल्या आरोपींपैकी एक कॅब चालक आहे. दुसऱ्या आरोपीचे वय ४४ वर्षे असून त्याचे शिक्षण नववीपर्यंत झाले आहे. तिसऱ्या आरोपीने बारावीपर्यंत शिक्षण घेतल्यानंतर दोन वर्षे महाविद्यालयीन शिक्षण घेतले आहे. गुन्हे शाखेकडून आता संबंधित बँक खाती, मोबाइल क्रमांक आणि पैशांच्या व्यवहारांची सखोल चौकशी सुरू आहे. या टोळीचे महाराष्ट्राबाहेरील अन्य राज्यांमध्ये तसेच संभाव्य परदेशी नेटवर्कशी संबंध आहेत का, याचाही तपास केला जात आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
334,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा