30 C
Mumbai
Friday, May 10, 2024
घरक्राईमनामाटाटा रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यासह अकरा जणांना अटक

टाटा रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यासह अकरा जणांना अटक

रुग्णांना वैद्यकीय चाचण्यासाठी पाठवत होते खाजगी लॅबमध्ये

Google News Follow

Related

रुग्णालयात सुविधा असतांना देखील चाचण्या करण्यासाठी कर्करोगग्रस्त रुग्णांना खाजगी डायगोनिस सेंटरला पाठवणाऱ्या टाटा रुग्णालयातील कर्मचाऱ्यासह खाजगी डायग्नोसिस सेंटर व्यवस्थापक आणि मालक असे एकूण २४ जणांविरुद्ध भोईवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.याप्रकरणी भोईवाडा पोलिसांनी खाजगी डायग्नोसिस सेंटरच्या व्यवस्थापकासह ११ जणांना अटक केली आहे.

 

मुंबईतील परळ या ठिकाणी असणाऱ्या टाटा मेमोरियल रुग्णालयातील कर्मचाऱ्याचे एक मोठे रॅकेट समोर आले आहे. या रॅकेट मध्ये काम करणारे कर्मचारी काही खाजगी डायग्नोस्टिक सेंटरच्या मालकांनी मिळून गरीब कर्करोगग्रस्त रुग्णांना लुबाडण्याचा उद्योग सुरू केला होता. रुग्णालयात विविध वैद्यकीय चाचण्या उपलब्ध असतांना येथील कर्मचारी केवळ स्वतःच्या आर्थिक फायद्याकरिता कमिशनसाठी त्यांना खाजगी डायग्नोसिस सेंटरमध्ये चाचणी करण्यास लावून गोरगरीब कॅन्सरग्रस्त रुग्णाची तसेच शासनाची देखील लाखो रुपयांचे आर्थिक फसवणूक करीत होती.

हे ही वाचा:

आता यूपीए नाही ‘इंडिया’

किरीट सोमय्या व्हीडिओ प्रकरणी मुंबई पोलिसांची कारवाई सुरू

किरीट सोमय्यांवर सीडी अस्त्राचा प्रयोग…

छोटा शकीलचे आर्थिक व्यवहार संभाळणाऱ्या आरिफ भाईजानची संपत्ती जप्त

या रॅकेटमध्ये इन्फिनिटी सेंटरचे व्यवस्थापक संजय सोनवणे व मालक तसेच इतर डायग्नोस्टिक सेंटर चालविणारे यांचासह २४ ते २५ जणांचा या रॅकेट मध्ये समावेश आहे. रुग्णालय प्रशासनाकडे याबाबत रुग्णाच्या नातलगाच्या अनेक तक्रारी आलेल्या होत्या, याबाबत अखेर प्रशासनाने भोईवाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. याप्रकरणी पोलिसांनी २० जणांविरुद्ध भा.द.वी.कलम ४०६,४०९,४२०,१२० (ब) गुन्हा दाखल केला असून ११जणांना अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्या मध्ये इन्फिनिटी सेंटरचे व्यवस्थापक संजय सोनवणे यांचा समावेश आहे.

 

एका गुप्त माहितीच्या आधारे, टाटा मेमोरियल हॉस्पिटलमधील सुरक्षा विभागाने, मुंबई पोलिसांच्या मदतीने रूग्णांना कमिशनसाठी बाहेरील इमेजिंग सेंटरमध्ये पाठवण्यात गुंतलेल्या हॉस्पिटलच्या काही कर्मचाऱ्यांना पकडले. परळ येथील डायग्नोस्टिक सेंटरच्या प्रतिनिधीकडून पैसे वसूल करताना दोन कर्मचाऱ्यांना रंगेहात पकडण्यात आले. इतर कर्मचाऱ्यांचाही यात समावेश आहे का, याचा तपास सुरू आहे. डॉक्टर सी एस प्रमेश यांच्याशी संपर्क साधला असता, संचालक म्हणाले, “टाटा मेमोरियल हॉस्पिटलमध्ये, आमच्याकडे रूग्णालयातील कॅन्सर केअरच्या नीतिनियमांविरुद्ध काम करणार्‍या कर्मचार्‍यांच्या विरोधात कठोरपणे वागण्याची मर्यादा खूप कमी आहे. ते पुढे म्हणाले की प्रशासनाने वेगाने आणि निर्णायकपणे काम केले आणि त्यांनी पुढील तपासासाठी हे प्रकरण पोलिसांकडे सोपवले आहे. संबंधित कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले असून, आरोप सिद्ध झाल्यास त्यांना बडतर्फ करण्यात येईल.”

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
152,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा