28 C
Mumbai
Thursday, March 12, 2026
घरक्राईमनामालाल किल्ला हल्ला प्रकरणी अश्फाकची फाशीची शिक्षा कायम

लाल किल्ला हल्ला प्रकरणी अश्फाकची फाशीची शिक्षा कायम

सर्वोच्च न्यायालयाने पुनर्विचार याचिका फेटाळून लावली

Google News Follow

Related

लाल किल्ल्यावर २२ वर्षांपूर्वी झालेल्या हल्ल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी मोठा निकाल दिला आहे. या हल्ल्यातील दोषी आरिफ उर्फ ​​अशफाक या दहशतवादीची फाशीची शिक्षा न्यायालयाने कायम ठेवली आहे. आरिफने सर्वोच्च न्यायालयात आपली शिक्षा माफ करण्यासाठी पुनर्विलोकन याचिका दाखल केली होती. तो म्हणाला की त्याने यापूर्वीच जन्मठेपेच्या बरोबरीची शिक्षा भोगली आहे.

लष्कर-ए-तैयबाचा दहशतवादी अश्फाक याला सर्वोच्च न्यायालयाने २०११ मध्ये फाशीची शिक्षा सुनावली होती. २२ डिसेंबर २००० रोजी लाल किल्ल्यावर झालेल्या हल्ल्यात २ लष्करी जवानांसह ३ जण शहीद झाले होते. या प्रकरणात ११ आरोपी पकडले गेले. त्यानंतर त्यांना शिक्षा झाली होती. आरिफ उर्फ ​​अशफाक हा याच प्रकरणात पकडलेला मुख्य आरोपी आहे. तेव्हापासून तो दिल्लीच्या तिहार तुरुंगात बंद आहे. नंतर कोर्टाने आरिफला दोषी ठरवून फाशीची शिक्षा सुनावली. मात्र अरिफने फाशीला स्थगिती देण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.

हे ही वाचा:

भारताने बांगलादेशला नमवले आणि पाकिस्तानची केली कोंडी

नाशिकमध्ये देशातील पहिली खासगी बाजार समिती

घरी बसून महाराष्ट्र पिंजून काढतायत उद्धव ठाकरे….

दादर, ठाणे रेल्वे स्टेशनवरील ‘स्टॉल’ उचलणार

लाल किल्ल्याच्या आत दहशतवाद्यांनी लष्करी जवानांवर हल्ला केला होता. हल्ला करण्यासाठी वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये ३० लाखांहून अधिक रुपये ट्रान्सफर करण्यात आले. हवाला या रकमेतून शस्त्रे खरेदी करण्यात आली. लष्कराच्या सहा दहशतवाद्यांनी लाल किल्ल्याच्या आत लष्कराच्या जवानांवर हल्ला केला. रात्री ९ वाजता लाल किल्ल्याच्या आत सुरू असलेल्या लाइट अँड साऊंड कार्यक्रमादरम्यान एके-४७ आणि हँडग्रेनेडने सज्ज झालेल्या दहशतवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार केला होता.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
297,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा