26 C
Mumbai
Thursday, February 5, 2026
घरक्राईमनामायुट्युबर एल्विश यादवच्या घरावर झाडल्या २४ गोळ्या

युट्युबर एल्विश यादवच्या घरावर झाडल्या २४ गोळ्या

गोळीबार करणाऱ्यांचा शोध सुरू

Google News Follow

Related

गुरुग्राममध्ये रविवारी पहाटे वादग्रस्त युट्यूबर आणि बिग बॉस विजेता एल्विश यादव यांच्या घराबाहेर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला.

पोलिसांच्या माहितीनुसार, हा प्रकार आज सकाळी ५.३० ते ६ वाजण्याच्या दरम्यान घडला. तिन्ही बाईकस्वारांनी सेक्टर ५७ मधील यादव यांच्या घरावर दोन डझनहून अधिक गोळ्या झाडल्या आणि पळ काढला.

गोळ्या घराच्या तळमजल्यावर आणि पहिल्या मजल्यावर लागल्या.

यादव स्वतः दुसऱ्या आणि तिसऱ्या मजल्यावर राहतो, मात्र त्यावेळी तो घरी नव्हता. गोळीबाराच्या वेळी घरातील केअरटेकर आणि काही कुटुंबीय आत होते, पण कुणालाही इजा झाली नाही.

“तीन मुखवटाधारी गुन्हेगारांनी गुरुग्रामच्या सेक्टर ५७ मधील युट्यूबर आणि बिग बॉस OTT विजेता एल्विश यादव याच्या घराबाहेर गोळीबार केला. हा प्रकार सकाळी साडेपाचच्या सुमारास घडला. दोन डझनपेक्षा जास्त गोळ्या झाडल्या गेल्या. एल्विश यादव त्या वेळी घरी नव्हता” अशी माहिती गुरुग्राम पोलिसांचे पीआरओ संदीप कुमार यांनी दिली.

पोलिस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले, फॉरेन्सिक पुरावे गोळा केले आणि परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली. अधिकाऱ्यांनी सांगितले की, कायदेशीर कारवाई सुरू करण्यात आली आहे आणि कुटुंबाकडून औपचारिक तक्रार आल्यानंतर पुढील तपास केला जाईल.

यादव यांच्या वडिलांनी सांगितले की, या घटनेपूर्वी त्यांना कोणत्याही प्रकारची धमकी मिळाली नव्हती. सध्या एल्विश यादव हरियाणाबाहेर आहे.

हे ही वाचा:

शुभांशू शुक्ला यांचे भारतात परतल्यानंतर भव्य स्वागत

श्रीमंत राजे रघुजी भोसले यांची ऐतिहासिक तलवार सोमवारी मुंबईत जल्लोषात येणार

जाडी अनेक आजारांचे मूळ

‘द बंगाल फाइल्स’चा ट्रेलर रिलीज

“आम्ही झोपलो होतो. तेव्हा हल्लेखोर मोटरसायकलवर आले आणि गोळीबार सुरू केला. त्यांच्यापैकी एक बाईकवर बसून राहिला आणि दोघांनी खाली उतरून घरावर गोळ्या झाडल्या. त्यांनी सुमारे २५ ते ३० राऊंड फायर केले आणि पळून गेले. या घटनेपूर्वी एल्विशला कुठलीही धमकी मिळाली नव्हती. तो कामानिमित्त सध्या शहराबाहेर आहे,” असे त्यांचे वडील म्हणाले.

२७ वर्षीय एल्विश यादव युट्यूबर म्हणून प्रसिद्ध झाला आणि २०२३ मध्ये बिग बॉस OTT २ चा विजेता ठरला. त्याचे अनेक चाहते आहेत. तो म्युझिक व्हिडिओ तसेच चित्रपटांमध्येही दिसला आहे.

मात्र, यादव अनेकदा वादात सापडला आहे. गेल्या वर्षी त्याला नोएडा पोलिसांनी एका प्रकरणात अटक केली होती, ज्यात रेव्ह पार्टीमध्ये सापाच्या विषाचा वापर झाल्याचा आरोप होता. पोलिसांनी दावा केला होता की कोब्रा विषाचे रिक्रिएशनल ड्रग म्हणून पुरवठा होत होता आणि यादव यासाठी व्यवस्था करत होता. त्यानंतर त्याला जामिनावर सोडण्यात आले, मात्र या प्रकरणातील आरोप अद्याप कायम आहेत.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
290,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा