29 C
Mumbai
Saturday, April 20, 2024
घरक्राईमनामातहव्वूर राणाला भारतात आणण्याचा मार्ग मोकळा !

तहव्वूर राणाला भारतात आणण्याचा मार्ग मोकळा !

मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यातील आरोपी तहव्वूर राणाला भारतात आणणार, अमेरिकन न्यायालयाचा आदेश.

Google News Follow

Related

मुंबईवर २००८ मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सहभागी असल्याचा आरोप असलेला पाकिस्तानी वंशाचा तहवूर राणा याला भारताच्या स्वाधीन केले जाणार आहे. कॅलिफोर्निया न्यायालयाने हा निर्णय दिला आहे. भारताने त्यासाठी जे प्रयत्न केले होते त्यांना यश येत आहे.न्यायाधीश जॅकलिन चुलीजन यांनी हा निर्णय देताना म्हटले की, अमेरिकन न्यायालयात ज्या कारणासाठी हा खटला सुरू होता, तो गुन्हा राणाला भारताच्या स्वाधीन करण्यासाठी लागू होतो.

पाकिस्तानस्थित लष्कर ए तोयबाने २६ नोव्हेंबर २००८ला मुंबईवर हा हल्ला केला होता. त्यात शेकडो नागरिकांचा मृत्यू झाला. कसाब हा पाकिस्तानी अतिरेकी यात जिवंत पकडला गेला होता. यात राणा याचा सहभाग असल्याचे स्पष्ट झाले होते
राष्ट्रीय तपास यंत्रणा (एन आय ए) या प्रकरणाचा तपास करत आहे.अमेरिकेत राणा याला अटक करण्यात आली होती. तेव्हा त्याला भारताच्या ताब्यात देण्याची एनआयएने मागणी केली होती.भारताची मागणी मान्य करत कॅलिफोर्नियाच्या नायालयाने दहशतवादी तहव्वूर राणा याला प्रत्यार्पण करण्याची परवानगी दिली आहे.

हे ही वाचा:

इम्रान खान यांना पुन्हा अटकेची भीती!

हेरगिरी प्रकरणःपत्रकारआणि नौदलाच्या माजी अधिकाऱ्याला सीबीआयकडून अटक !

प्रशांत किशोर म्हणाले, ‘कर्नाटकच्या निकालाला गृहित धरू नका’

सिद्धरामय्या यांचा मुख्यमंत्रीपदाचा मार्ग मोकळा; शिवकुमार उपमुख्यमंत्री

तहव्वूर राणा एकूण ७ भाषा बोलू शकतो..
तहव्वूर राणा याचा जन्म पाकिस्तानात झाला. त्याने आर्मी मेडिकल कॉलेजमध्ये शिक्षण घेतले आणि १० वर्षे पाकिस्तान आर्मीमध्ये संलग्न डॉक्टर म्हणून काम केले.पण त्याला स्वतःचे काम आवडले नसल्याने त्याने नोकरी सोडली.राणा आता कॅनडाचा नागरिक आहे.पण अगदी अलीकडे तो शिकागोचा रहिवासी होता, जिथे त्याचा व्यवसाय होता.कोर्टाच्या कागदपत्रांनुसार, तो कॅनडा,पाकिस्तान,जर्मनी आणि इंग्लंडमध्ये गेला आहे आणि तेथे असताना तो सुमारे ७ भाषा बोलू शकतो.

२००८ च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यात सहा अमेरिकन लोकांसह एकूण १६६ लोक मारले गेले होते ज्यात १० पाकिस्तानी दहशतवाद्यांनी ६० तासांहून अधिक काळ वेढा घातला, मुंबईच्या प्रतिष्ठित आणि महत्त्वाच्या ठिकाणी हल्ले करून लोकांची हत्या केली होती.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
147,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा