32 C
Mumbai
Thursday, April 18, 2024
घरराजकारणप्रशांत किशोर म्हणाले, ‘कर्नाटकच्या निकालाला गृहित धरू नका’

प्रशांत किशोर म्हणाले, ‘कर्नाटकच्या निकालाला गृहित धरू नका’

आधीच्या विधानसभा निवडणुकांनंतर झालेल्या अवस्थेची करून दिली आठवण

Google News Follow

Related

पूर्वीचे राजकीय रणनितीकार आणि आता कार्यकर्ता झालेले प्रशांत किशोर यांनी बुधवारी काँग्रेसला इशारा दिला. कर्नाटक विधानसभा निवडणुकीत मिळालेला विजय हा २०२४च्या लोकसभा निवडणुकीची नांदी म्हणून गृहित धरण्याची चूक करू नका’, असे विधान त्यांनी केले आहे.

आयपीएसीचे (इंडियन पॉलिटिकल एक्शन कमिटी) संस्थापक असणाऱ्या प्रशांत किशोर यांनी त्यांच्या मूळ राज्य असणाऱ्या बिहारमध्ये ‘जन सूरज’ ही मोहीम सुरू केली आहे. त्यात त्यांनी हे विधान केले.

२०१३च्या कर्नाटक निवडणुकीत काँग्रेसने विजय मिळवला असला तरीही २०१४च्या संसदीय निवडणुकीत मात्र त्यांना भाजपकडून पराभव पत्करावा लागला होता. तर, २०१९मध्येही भाजपने काँग्रेसला धूळ चारली होती. त्या आधी वर्षभरापूर्वी तीन प्रमुख राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने विजय मिळवल्यानंतरही त्यांच्यावर ही वेळ ओढवली होती, याकडे त्यांनी लक्ष वेधले.

“कर्नाटकमध्ये काँग्रेसला मिळालेल्या यशाबद्दल मी त्यांचे अभिनंदन करतो. पण मी पक्षाच्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना लोकसभा निवडणुकीत काय वाढून ठेवले आहे, याचा इशारा देण्यासाठी विधानसभा निवडणुकीचा निकाल गृहित धरू नका, म्हणून सावध करतो आहे,’ असे प्रशांत किशोर यांनी सांगितले.

प्रशांत किशोर हे बिहारमध्ये पदयात्रा करत आहेत. मात्र दोन दिवसांपूर्वी त्यांच्या स्नायूंना दुखापत झाल्याने ते अज्ञात स्थळी उपचार घेत आहेत.

काँग्रेसला इशारा देण्यासाठी त्यांनी आकडेवारी देऊन स्पष्टीकरण मांडले. ‘सन २०१२मध्ये समाजवादी पक्ष उत्तर प्रदेशमध्ये स्पष्ट बहुमताने सत्तेवर आला होता. मात्र दोन वर्षांनंतर लोकसभा निवडणुकीत भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएने राज्यात ८० पैकी ७३ जागांवर विजय मिळवला,’ असे त्यांनी निदर्शनास आणून दिले.

त्यांनी २०१३च्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीची आठवणही सांगिली. जेव्हा काँग्रेसने बहुमत मिळवले होते, मात्र लगेचच पुढच्या वर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांना भाजपकडून दयनीय पराभव पत्करावा लागला होता.

हे ही वाचा:

न्यायाधीश शहा म्हणतात, मोदींचा गौरव केला यात चूक काय?

पावसाळ्यात आपत्कालीन परिस्थितीत ‘बेस्ट’ मदतीला धावणार

वानखेडेंच्या सहकाऱ्याने ३० लाखांचे घड्याळ चोरले?

चिनाई कॉलेज सुरू करण्यासाठी काँग्रेसचे आंदोलन

काँग्रेसने २०१८च्या विधानसभा निवडणुकीत मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये चांगले यश मिळवले. मात्र त्यानंतर अवघ्या काही महिन्यांतच झालेल्या २०१९च्या लोकसभा निवडणुकीत या राज्यांमध्ये काँग्रेसची दारूण स्थिती झाली, याकडे त्यांनी लक्ष वेधले.

४५ वर्षीय प्रशांत किशोर यांनी आतापर्यंत नरेंद्र मोदी, नितीश कुमार, अरविंद केजरीवाल, एमके स्टॅलिन आणि जगनमोहन रेड्डी यांसारख्या वैविध्यपूर्ण नेत्यांच्या निवडणूक मोहिमा हाताळल्या आहेत.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
147,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा