34 C
Mumbai
Saturday, June 3, 2023
घरविशेषपावसाळ्यात आपत्कालीन परिस्थितीत 'बेस्ट' मदतीला धावणार

पावसाळ्यात आपत्कालीन परिस्थितीत ‘बेस्ट’ मदतीला धावणार

फ्लडिंग पॉइंटवर ४०० बसेस करणार तैनात

Google News Follow

Related

दरवर्षीच्या जोरदार पावसांत रेल्वे ठप्प झाल्यावर अडकून पडणा-या प्रवाशांच्या सेवेसाठी आता बेस्ट बस धावणार आहे. मुंबई उपनगरीय रेल्वेच्या हद्दीतील २५ हून अधिक फ्लडिंग पॉइंट म्हणजे पाणी साचणाऱ्या ठिकाणी तब्बल ४०० बेस्ट बसेस तैनात करण्यात येणार आहेत.

मुंबई महापालिकेच्या माध्यमातून नालेसफाई, रेल्वे हद्दीतील नाल्यांची सफाई, छोटी गटारातील गाळ उपसा करण्याचे काम सुरु आहे. मात्र, तरीही जोरदार पावसांत मुंबईतील सखल भागात पाणी साचते. कुर्ला, सायन, माटुंगा, परळ, वडाळा, शिवडी, अंधेरी, सांताक्रुझ आदी मुंबई उपनगरीय रेल्वे हद्दीतील रुळ पाण्याखाली जातात. त्यामुळे मुंबईकरांची लाईफ लाईन ठप्प होते. पाण्याचा निचरा लवकर होत नसल्याने प्रवासी रेल्वे स्थानक किंवा परिसरात अडकून पडतात. प्रवाशांच्या सेवेसाठी आता पावसाळ्यात सेवा दिली जाणार आहे. रेल्वे हद्दीत रेल्वे रुळ पाण्याखाली जाणाऱ्या स्पॉटवर ४०० बसेस तैनात करण्यात येणार असल्याची माहिती बेस्ट उपक्रमाचे महाव्यवस्थापक लोकेश चंद्र यांनी दिली.

मुसळधार पावसात मुंबईत आपत्कालीन परिस्थिती ओढावल्यास मुंबई महापालिका, एनडीआरएफ, नेव्हीची पथके अलर्ट मोडवर ठेवण्यात येतात. यंदा तर एनडीआर एफच्या दोन अतिरिक्त टीम अशा एकूण ५ टीम तैनात करण्यात येणार आहेत. मुंबईकरांची लाईफ लाईन म्हणून ओळख असलेली मुंबई उपनगरीय रेल्वेचे वेळापत्रक पावसाळ्यात कोलमडते. मुंबई उपनगरीय रेल्वेच्या हद्दीत २५ फ्लडिंग पॉइंट्स असून दरवर्षी या फ्लडिंग पॉईंट्सवरील रुळ पाण्याखाली जातात आणि प्रवाशांचे हाल होतात. त्यामुळे यंदाच्या पावसाळ्यात बेस्ट उपक्रमाने रेल्वे हद्दीतील २५ फ्लडिंग पॉईट्सवर बसेस तैनात करण्याचा निर्णय घेतला आहे.

हे ही वाचा:

श्रद्धा वालकरला श्रद्धांजली वाहण्यासाठी मूक रॅलीचे आयोजन

चिनाई कॉलेज सुरू करण्यासाठी काँग्रेसचे आंदोलन

१० कोटींच्या वरील कामांवर दक्षता विभाग ठेवणार वॉच

“त्र्यंबकेश्वर मंदिरामधील घुसखोरी म्हणजे मंदिरावर कब्जा करण्याचा सुनियोजित कट समजावा”

या रेल्वे स्थानकाजवळ बससेवा –

मस्जिद बंदर, सेंडहर्स्ट रोड, भायखळा, चिंचपोकळी, परळ, माटुंगा, सायन, कुर्ला, विद्याविहार, घाटकोपर, विक्रोळी, भांडुप, नाहूर, वडाळा, शिवडी आणि टिळक नगर, वांद्रे, सांताक्रुझ, अंधेरी या ठिकाणी रेल्वे प्रवाशांची गैरसोय दूर करण्यासाठी बसेस तैनात करण्यात येणार आहेत.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,851चाहतेआवड दर्शवा
2,022अनुयायीअनुकरण करा
76,300सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा