29 C
Mumbai
Thursday, April 25, 2024
घरविशेषनियमित व्यायाम, योगा करा उच्च रक्तदाब आणि मधुमेहाला दूर ठेवा

नियमित व्यायाम, योगा करा उच्च रक्तदाब आणि मधुमेहाला दूर ठेवा

पालिका आरोग्य विभागाकडून आवाहन

Google News Follow

Related

उच्च रक्तदाब आणि मधुमेह या जीवन शैलीशी निगडीत आजारांना ‘सायलेंट किलर’ म्हणून ओळखले जाते. हे आजार शरीराला हळूहळू हानी पोहोचवतात. परंतु, योग्य उपचार आणि जीवनशैलीत बदल केला, तर उच्च रक्तदाब आणि मधुमेहावर नियंत्रण ठेवता येते. त्यामुळे उच्च रक्तदाब आणि मधुमेहाला दूर ठेवण्यासाठी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार नियमित योगा आणि व्यायाम करावा, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने केले आहे.

मुंबई उपनगरांमध्ये सर्वेक्षण करून उच्च रक्तदाब आणि मधुमेह असलेल्या रूग्णांना महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाकडून विविध सेवा-सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत. सध्याच्या धावपळीच्या व बदलत्या जीवनशैलीशी निगडित असणाऱ्या रक्तदाब व मधुमेह अशा आजारांबाबतही सातत्याने जाणीव जागृती करण्यात येते.
लठ्ठपणा, आहारातील मीठाचा अतिवापर, धुम्रपान व मद्यपान, ताण-तणाव आणि कोलेस्ट्रॉलच्या अतिउच्च पातळीमुळे उच्च रक्तदाबासारखे आजार जडण्याची शक्यता असते. परंतु, योग्य उपचार पद्धती आणि जीवनशैलीत बदल केले तर उच्च रक्तदाब नियंत्रणात राहू शकतो. रोजच्या आहारातील मीठाचे प्रमाण ५ ग्रॅम पेक्षा कमी ठेवा, पुरेशी झोप व विश्रांती घ्या, आहारात फळे, भाज्या व कमी चरबीयुक्त अन्नाचे सेवन करा आणि सर्वात म्हत्वाचे म्हणजे रक्तदाबाची नियमित तपासणी करा असे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.

सतत डोके दुखणे, थकवा जाणवणे, छातीत दुखणे, धाप लागणे, अनियमित ह्दयाचे ठोके, अस्पष्ट/दुहेरी दृष्टी आणि अस्वस्थ वाटणे, ही उच्च रक्तदाबाबची लक्षणे आहेत. बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील उच्च रक्तदाब आणि मधुमेहाची लक्षणे असलेल्या रूग्णांचे वेळीच निदान होऊन या रूग्णांना अधिकाधिक परिणामकारक वैद्यकीय औषधोपचार मिळावेत, यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका सातत्याने विविध स्तरिय प्रयत्न करीत असते. याच प्रयत्नांचा भाग म्हणून ४ जानेवारी २०२३ पासून महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाकडून आठवड्यातील प्रत्येक बुधवारी आरोग्य सेविका आणि आशा सेविकांच्या मदतीने मुंबई उपनगरांसह झोपडपट्ट्यांच्या भागात लोकसंख्या आधारित स्क्रीनिंग सर्वेक्षण केले जात आहे. या सर्वेक्षणात घरोघरी भेट देऊन ३० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या व्यक्तींचे स्क्रीनिंग केले जाते. या सर्वेचा सध्या १९ वा टप्पा पूर्ण झाला आहे.

हे ही वाचा:

चिनाई कॉलेज सुरू करण्यासाठी काँग्रेसचे आंदोलन

देशमुखांना अडचणीत आणण्यासाठी परमबीर सिंह यांना आणले कोणी?

१० कोटींच्या वरील कामांवर दक्षता विभाग ठेवणार वॉच

“त्र्यंबकेश्वर मंदिरामधील घुसखोरी म्हणजे मंदिरावर कब्जा करण्याचा सुनियोजित कट समजावा”

घरोघरी सर्वेक्षण –

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य खात्याअंतर्गत कार्यरत असलेल्या आरोग्य सेविका आणि आशा सेविकांनी बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील २४ प्रभागांमधील झोपडपट्टी भागात हे सर्वेक्षण केले. यामध्ये १९ व्या टप्प्यापर्यंत २४ प्रभागांमधील तब्बल २ लाख ६१ हजार १८५ घरांना भेटी देऊन ३० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या ४ लाख ४५ हजार ५४९ व्यक्तींची तपासणी करण्यात आली. नमुना पद्धतीने ही तपासणी करण्यात आली. तपासणी करण्यात आलेल्या नागरिकांपैकी २९ हजार ६२४ उच्च रक्तदाबाचे संशयीत रूग्ण आढळून आले. सर्वेक्षणाच्या १९ व्या टप्प्यानंतर बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात ६२ हजार ३९१ नागरिकांना आधीपासूनच उच्च रक्तदाब असल्याचे असल्याचे आढळून आले आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
148,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा