28.2 C
Mumbai
Monday, October 19, 2026
घरक्राईमनामाभारतीय तटरक्षक दलाने पाकिस्तानींसह पकडले ३ हजार कोटींचे ड्रग्स

भारतीय तटरक्षक दलाने पाकिस्तानींसह पकडले ३ हजार कोटींचे ड्रग्स

अरबी समुद्रात इराणी बोट ताब्यात

Google News Follow

अरबी समुद्रात अमली पदार्थांची तस्करी करण्याचा मोठा प्रयत्न भारतीय तटरक्षक दलाने हाणून पाडला आहे. भारतीय तटरक्षक दल आणि गुजरातच्या दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) संयुक्त कारवाई करत एका इराणी बोटीतून तब्बल ५२६ किलो अमली पदार्थ जप्त केले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात या अमली पदार्थांची किंमत ३,००० कोटी रुपयांहून अधिक असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. या कारवाईत बोटीवरील पाच पाकिस्तानी नागरिकांना ताब्यात घेण्यात आले आहे.

ही कारवाई लक्षद्वीपच्या पश्चिमेकडील अरबी समुद्रात करण्यात आली. गुप्तचर माहितीच्या आधारे समुद्र आणि हवाई पाळत ठेवण्यात आली होती. संशयास्पद हालचाली करणाऱ्या इराणी बोटीचा माग काढल्यानंतर तटरक्षक दलाच्या पथकाने तिचा पाठलाग करून ती अडवली. त्यानंतर बोटीवर चढून झडती घेतली असता मोठ्या प्रमाणावर अमली पदार्थ आढळून आले.

तटरक्षक दलाच्या माहितीनुसार, बोटीतून जप्त करण्यात आलेल्या अमली पदार्थांमध्ये हेरॉईन आणि मेथॅम्फेटामाइनचा समावेश आहे. एकूण जप्तीचे वजन सुमारे ५२६ किलो असून, त्याची आंतरराष्ट्रीय बाजारातील अंदाजे किंमत ३,००० कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. त्यामुळे अलीकडच्या काळातील समुद्रमार्गे होणाऱ्या अमली पदार्थ तस्करीविरोधातील ही मोठी कारवाई मानली जात आहे.

हे ही वाचा:

इराणचा संयुक्त राष्ट्रांवर ‘शोले’ स्टाईल हल्लाबोल

बडगाममध्ये लष्कर-ए-तोयबाचा प्रमुख दहशतवादी मूसा ठार

काठुआत सीआयएसएफ जवानाचा सहकाऱ्यांवर गोळीबार

ठाण्यात उबाठा नेते प्रदीप ‘बाळा’ पूर्णेकर यांच्यावर गोळीबार

इराणी बोट, पाकिस्तानी क्रू

या प्रकरणातील एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे अमली पदार्थांची खेप ज्या बोटीतून नेली जात होती ती इराणी असल्याचे समोर आले आहे. या बोटीवर पाच पाकिस्तानी नागरिक असल्याचे आढळून आले. तटरक्षक दलाने बोटीसह सर्व संशयितांना ताब्यात घेतले असून, त्यांची चौकशी सुरू आहे. या अमली पदार्थांच्या तस्करीमागे कोणते आंतरराष्ट्रीय नेटवर्क आहे, याचा तपास केला जात आहे. कारवाईनंतर जप्त केलेल्या अमली पदार्थांसह इराणी बोट आणि ताब्यात घेतलेल्या पाच पाकिस्तानी नागरिकांना मुंबईकडे आणण्यात येत आहे.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
339,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा