35 C
Mumbai
Sunday, October 4, 2026
घरक्राईमनामापहलगाम हल्ल्यातील मोस्ट वाँटेड दहशतवादी हाशिम मूसा ठार

पहलगाम हल्ल्यातील मोस्ट वाँटेड दहशतवादी हाशिम मूसा ठार

बडगाममध्ये सुरक्षा दलांना मोठे यश

Google News Follow

Related

जम्मू-काश्मीरमधील बडगाम जिल्ह्यात सुरक्षा दलांनी केलेल्या कारवाईत पाकिस्तानस्थित दहशतवादी संघटना लष्कर-ए-तैयबाचा मोस्ट वाँटेड दहशतवादी मोहम्मद आसिफ उर्फ हाशिम मूसा ठार झाला आहे. पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील प्रमुख संशयितांपैकी एक असलेल्या हाशिम मुसाचा तपास यंत्रणा शोध घेत होत्या.

बडगाममधील पालमेदान परिसरात झालेल्या चकमकीत मूसा ठार झाला असून त्याचा मृतदेहही सुरक्षा दलांनी ताब्यात घेतला आहे. त्याच्या मृतदेहाजवळून सुरक्षा दलांनी शस्त्रे आणि संशयास्पद साहित्यही जप्त केले आहे. भारतीय लष्कराच्या चिनार कॉर्प्सने या कारवाईची माहिती दिली आहे.

गुप्तचर यंत्रणेकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे भारतीय लष्कर, जम्मू-काश्मीर पोलीस आणि केंद्रीय राखीव पोलीस दलाने बडगाम जिल्ह्यातील युसमार्ग परिसरात संयुक्त शोधमोहीम सुरू केली होती. त्यावेळी सुरक्षा दलांना संशयास्पद हालचाली आढळल्या. सुरक्षा दलांनी शरण येण्याचे आवाहन केल्यानंतर दहशतवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार सुरू केला. त्याला प्रत्युत्तर देताना सुरक्षा दलांनीही गोळीबार केला. यावेळी झालेल्या चकमकीत हाशिम मूसा ठार झाला. त्यानंतर त्याचा मृतदेह सापडला असून मोठ्या प्रमाणावर शस्त्रसाठाही जप्त करण्यात आला आहे. परिसरात आणखी दहशतवादी लपले आहेत का, याचा शोध घेण्यासाठी सुरक्षा दलांची शोधमोहीम सुरू आहे.

२० लाख रुपयांचे होते बक्षीस

२२ एप्रिल २०२५ रोजी पहलगाममधील बैसरन परिसरात पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ जणांचा मृत्यू झाला होता. या हल्ल्यानंतर जम्मू-काश्मीर पोलिसांनी संशयित हाशिम मूसा, अली भाई आणि आदिल हुसैन थोकर यांचे फोटो प्रसिद्ध केले होते. त्यांच्याबाबत माहिती देणाऱ्यास प्रत्येकी २० लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते.

हे ही वाचा:

इराणचा संयुक्त राष्ट्रांवर ‘शोले’ स्टाईल हल्लाबोल

भारतीय तटरक्षक दलाने पाकिस्तानींसह पकडले ३ हजार कोटींचे ड्रग्स

काठुआत सीआयएसएफ जवानाचा सहकाऱ्यांवर गोळीबार

ठाण्यात उबाठा नेते प्रदीप ‘बाळा’ पूर्णेकर यांच्यावर गोळीबार

सुरक्षा यंत्रणांच्या तपासानुसार, हाशिम मूसा हा पाकिस्तानी नागरिक असून लष्कर-ए-तैयबाशी संबंधित होता. तपासात तो पाकिस्तानच्या स्पेशल सर्व्हिसेस ग्रुपमध्ये पॅरा-कमांडो म्हणून कार्यरत असल्याचे समोर आले. २०२५ मध्ये पहलगाम हल्ल्यानंतर त्याचा माग काढण्यासाठी जम्मू-काश्मीरमध्ये मोठ्या प्रमाणावर कारवाया करण्यात आल्या होत्या. पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या तपासात राष्ट्रीय तपास संस्थेने पाकिस्तानस्थित लष्कर-ए-तैयबा आणि त्याच्या छुप्या संघटनेचा, द रेजिस्टन्स फ्रंटचा उल्लेख केला आहे. एनआयएने दाखल केलेल्या १,५९७ पानी आरोपपत्रात हल्ल्यामागील कटाचा तपशील देण्यात आला असून पाकिस्तानस्थित दहशतवादी साजिद जट्ट यालाही या प्रकरणात आरोपी करण्यात आले आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
336,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा