आंबेनळीत चालकाला झोप लागली, स्कॉर्पिओ पडली १००० फूट खाली

साताऱ्याच्या ८ तरुणांचा मृत्यू

आंबेनळीत चालकाला झोप लागली, स्कॉर्पिओ पडली १००० फूट खाली

स्वतःच्या गाडीने प्रवास करत असताना पुरेशी विश्रांती असेल तर ठीक नाहीतर अपघातास निमंत्रण मिळू शकते. आंबेनळी येथे तब्बल १००० फूट खोल दरीत गाडी कोसळून ८ तरुणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. या अपघातास हेच कारण असल्याचे सांगितले जात आहे.

साताऱ्याच्या ८ तरुणांना या अपघातात जीव गमवावा लागला. दोन दिवस हर्णे बीचवर मजा करून परतताना चालकाला झोप लागल्याने हा अपघात झाल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. हा अपघात पहाटे पावणे तीनला झाला आहे.

महाबळेश्वर आणि पोलादपूर दरम्यानच्या आंबेनळी घाट आहे. या घाटात अनेक अपघात होत असल्याचे वारंवार दिसले आहे. हे सगळे तरुण स्कॉर्पिओ गाडीने प्रवास करत होते.

१००० फूट खोल दरीतून हे मृतदेह काढणं कठिण होतं. त्यात अंधार असल्याने बचाव कार्यही नीट पार पाडता येत नव्हतं.  पोलिसांनी चार पथकांच्या सहाय्याने हे बचाव कार्य सुरू केले आहे.  केलं आहे. प्रतापगड ट्रेकर्स, महाबळेश्वर ट्रेकर्स, रोह्याचं सह्याद्री रेस्क्यू फाऊंडेशन आणि महाडचं रेस्कू फाऊंडेशन अशा चार रेस्क्यू फाऊंडेशनच्या माध्यमातून हे रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.

हे ही वाचा:

सायनच्या प्रतीक्षा नगर डेपोत बेस्ट बसला आग; जीवितहानी नाही

निवडणूक आयोगाच्या निर्देशांचे पालन केल्याने बदली झालेल्या ८२ अधिकाऱ्यांची होणार पुनर्नियुक्ती

राजस्थानमधील कुंभलगडच्या तटबंदीला दुसऱ्या सर्वात लांब तटबंदीचा बहुमान

पुनर्वसनाबाबत अनिश्चितता; दिल्ली जिमखाना क्लबची सरकारकडे ‘ही’ विनंती

पोलिसांनी आतापर्यंत दोन मृतदेह ताब्यात घेतले आहेत. दोन्ही मृतदेह कोल्हापूरला सरकारी रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. इतर सहा तरुणांचे मृतदेह शोधण्याचं काम सुरू आहे. हे आठही तरुण साताऱ्याचे आहेत. ते शुक्रवारी रत्नागिरीत मजा करण्यासाठी आले होते. हर्णे बीचवर दोन दिवस मजामस्ती केल्यानंतर रविवारी संध्याकाळी ५-६ वाजता ते परतीच्या मार्गाला लागले. साताऱ्याला जात असतानाच त्यांचा हा अपघात झाला. त्यात आठही जणांचा जागीच मृत्यू झाल्याचं पोलिसांनी सांगितलं.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नातेवाईंकाच्या मते, शुक्रवारी रात्री ही मुलं रत्नागिरीला हर्णे बीचवर आली होती. शनिवारी त्यांनी हर्णे बीचवर मुक्काम केला. त्यानंतर रविवारी पहाटे अडीच वाजता हर्णे बीचवरून जात होते. सर्वजण थकले होते. कुणीही विश्रांती घेतलेली नव्हती. चालकाला झोप आल्याने हा अपघात घडला असावा, असा पोलिसांचा कयास आहे.

Exit mobile version