31 C
Mumbai
Tuesday, May 21, 2024
घरक्राईमनामावायू प्रदूषणाप्रकरणी मुंबई पोलिसांकडून बिल्डरविरोधात गुन्हा दाखल

वायू प्रदूषणाप्रकरणी मुंबई पोलिसांकडून बिल्डरविरोधात गुन्हा दाखल

मुंबई महापालिकेच्या तक्रारीनंतर कारवाई

Google News Follow

Related

देशातील महत्त्वाच्या शहरांमधील वाढते प्रदूषण हा एक चिंतेचा विषय ठरत आहे. दिल्ली, मुंबई, पुणे यांसारख्या शहरांमध्ये प्रदूषण वाढत असून ही गंभीर समस्या बनली आहे. अशातच देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत आता पोलिसांनी प्रदूषणाला आळा घालण्यासाठी म्हणून कठोर पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे. वाढत्या वायू प्रदूषणाप्रकरणी मुंबई पोलिसांनी बांधकाम व्यावसायिकांवर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. उच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक सूचनांचं पालन न केल्याने आणि शहरात वायू प्रदूषण निर्माण केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी बांधकाम व्यावसायिकांविरुद्ध पहिला गुन्हा दाखल केला आहे.

मुंबईतील सांताक्रूझ पोलीस ठाण्यात एका बिल्डरविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरातील वायू प्रदूषण रोखण्यासाठी पुरेशा उपाययोजना करण्यात अपयशी ठरल्याबद्दल मुंबई उच्च न्यायालयाने नागरी संस्थेवर टीका केली. त्यानंतर बीएमसीच्या तक्रारीवरून मुंबई पोलिसांनी बिल्डरविरुद्ध नोंदवलेला हा पहिला एफआयआर आहे. सांताक्रूझ पोलिसांनी सोमवारी भारत रियल्टी व्हेंचर्स प्रायव्हेट लिमिटेड विरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम २९१ (बंद करण्याच्या आदेशानंतर उपद्रव चालू ठेवणं) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार, बिल्डर भारत रियल्टी व्हेंचर्स प्रायव्हेट लिमिटेड यांनी आपल्या बांधकाम साईटवर २५ फूट उंचीचा पत्रा लावलेला नाही आणि बांधकामाच्या ठिकाणी योग्य काळजी घेतलेली नाही. त्यामुळे लोकांना धूळ किंवा इतर गोष्टींच्या त्रासाला सामोरं जावं लागत आहे. म्हणून बीएमसीनं आरोपींना ३५४अ बीएमसी कायद्यांतर्गत नोटीस बजावली असून त्याची एक प्रत सांताक्रूझ पोलीस ठाण्यालाही देण्यात आलेली आहे.

हे ही वाचा:

इस्रायलकडून लष्कर-ए-तैयबा दहशतवादी संघटना म्हणून घोषित!

‘मायक्रोसॉफ्टमध्ये काम करण्यास मी खूप उत्सुक’

अबब!! १९२६ सालच्या दुर्मिळ मॅकलन व्हिस्कीसाठी मोजले २.७ मिलियन डॉलर्स

‘भारताचे फलंदाज चांगले खेळले नाहीत; खेळपट्टीला दोष देणार नाही’

दरम्यान, प्राप्त तक्रारीनुसार, आरोपींनी बांधकामाच्या ठिकाणी २५ फूट उंचीचा पत्रा न टाकता पुन्हा बांधकाम सुरू केलं, ज्यामुळे लोकसेवकाच्या आदेशाचं उल्लंघन झालं आणि म्हणून बीएमसीचा तक्रारीवरून बिल्डर भारत रियल्टी व्हेंचर्स प्रायव्हेट लिमिटेड यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
154,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा