नागपूर येथ समाजसेविका म्हणून स्वत:ची ओळख करून देणाऱ्या राजश्री सेन या बालविक्रेत्या निघाल्या. पाच दिवसांच्या मुलाला १ लाख रुपयांना विकल्याच्या आरोपावरून शांतीनगर पोलिसांनी बुधवारी तिला अटक केली.
शहर पोलिस प्रमुख अमितेश कुमार यांनी शांती नगर पोलिसांना सेन आणि बाळ विकत घेतलेल्या जोडप्याविरुद्ध मानवी तस्करीचा गुन्हा नोंदवून त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले. “बाळाला तुळजापूरला नेण्यात आले होते. ही बातमी कळताच उस्मानाबाद पोलिसांच्या मदतीने त्या बाळाची सुटका करण्यात आली,” कुमार म्हणाले. शांतीनगर येथे सेनच्या घरी घरगुती नोकर म्हणून काम करणारी महिला गर्भवती होती. तिच्या प्रसूतीच्या हिशोबाने तिला मेयो हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. ही योजना पार पाडण्यासाठी बोगस आधार कार्ड तयार केले गेले. ते बनावटी आधार कार्ड वापरून महिलेची नोंदणी त्या रुग्णालयात करण्यात आली होती. बाळाचा जन्म ११ नोव्हेंबर रोजी झाला आणि १६ नोव्हेंबर रोजी त्याला विकण्यात आलं.
हे ही वाचा:
फारुख अब्दुल्ला यांचा नॅशनल कॉन्फरन्सच्या अध्यक्षपदाचा राजीनामा
शास्त्रज्ञाला दिली शिरच्छेदाची धमकी
ऍमेझॉन कंपनी करणार कर्मचारी कपात ?
निवडणूक अधिकाऱ्याने इन्स्टाग्रामवर पोस्ट टाकली आणि बसला दणका
मुलाच्या आईने तक्रार दाखल केली असली तरी, एका आतल्या व्यक्तीने पोलिसांना सांगितले की ती देखील योजनेचा भाग असू शकते. प्रसूतीनंतर, आईने तिच्या तक्रारी मध्ये म्हटले आहे की सेनच्या निवासस्थानातील एका खोलीत तिला बंद करण्यात आले होते, जिथे ती काम करत होती आणि राहिली होती.त्याच दरम्यान तिचा मुलाला विकले जात होते. आईच्या तक्रारीनुसार, १५ नोव्हेंबर रोजी दोन अज्ञात व्यक्ती सेन यांच्या घरी आले होते. सेन यांनी आईला पहिल्या मजल्यावर कोंडून ठेवले. दुसऱ्या दिवशी, आईने दावा केला की एका महिलेसह काही अनोळखी व्यक्ती सेनच्या ठिकाणी परत आल्या, जेव्हा तिला पुन्हा लॉक केले गेले.
शांतीनगर पोलिस स्टेशनचे प्रभारी सुनील चव्हाण म्हणाले की, सेनचा मानवी तस्करीच्या इतर अनेक गुन्ह्यांमध्ये सहभाग असल्याची माहिती आहे आणि त्याची चौकशी सुरू आहे. सेनला २२ नोव्हेंबरपर्यंत कोठडीत पाठवण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.







