26 C
Mumbai
Wednesday, November 30, 2022
घरविशेषनिवडणूक अधिकाऱ्याने इन्स्टाग्रामवर पोस्ट टाकली आणि बसला दणका

निवडणूक अधिकाऱ्याने इन्स्टाग्रामवर पोस्ट टाकली आणि बसला दणका

निवडणूक आयोगाकडून आयएएस अधिकाऱ्याची उचलबांगडी

Google News Follow

Related

गुजरातमध्ये विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरु आहे. यादरम्यान, निवडणुकीच्या ड्युटीवर असताना इन्स्टाग्रामवर पोस्ट करणं एका आयएएस अधिकाऱ्याला चांगलंच महागात पडलं आहे. आयएएस अधिकारी अभिषेक सिंह यांनी इन्स्टाग्रामवर पोस्ट टाकल्याप्रकरणी निवडणूक आयोगाने निवडणूक ड्यूटीवरून उचलबांगडी केली आहे.

आयएएस अधिकारी अभिषेक सिंह यांची निवडणूक निरीक्षक म्हणून नियुक्ती जाहीर झाली. सिंह यांनी याची इंस्टाग्रामवर पोस्ट टाकली. त्यांच्या या पोस्टमुळे निवडणूक आयोगाने निवडणूक ड्युटीवरून सिंह यांना काढून टाकले आहे. सिंह उत्तर प्रदेश कॅडरचे आयएएस अधिकारी आहेत. डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीला गुजरातमध्ये विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. यापूर्वी अहमदाबादेतील बापूनगर आणि असरवा या दोन विधानसभा मतदारसंघासाठी अभिषेक सिंह यांची नेमणुक निवडणूक निरीक्षक म्हणून करण्यात आली होती. अभिषेक सिंह यांनी त्यांच्या अधिकृत पदाचा वापर पब्लिसिटी स्टंट म्हणून केला, असं आपल्या आदेशात निवडणूक आयोगाने म्हटले आहे.

हे ही वाचा :

अटलबिहारी वाजपेयींच्या जीवनपटाचे शिवधनुष्य उचलले दिग्दर्शक रवी जाधव यांनी

आफताबने केलेल्या मारहाणीमुळे श्रद्धा दोन वर्षांपूर्वी ‘ऍडमिट’ होती

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर एर्टिगा कारचा झाला चक्काचूर, पाच जणांचा मृत्यू

भारतातील पहिले खाजगी रॉकेट ‘विक्रम-एस’ लाँच

सिंह यांनी इंस्टाग्रामवर केलेल्या पोस्टमध्ये ते निरीक्षकांच्या सरकारी गाडीच्या बाजुला उभे असल्याचे दिसत आहे. गुजरात निवडणुकीसाठी निवडणूक निरीक्षक म्हणून रुजू, अशा कॅप्शनसह सिंह यांनी फोटो टाकले होते. त्यामुळे निवडणूक आयोगाने या अधिकाऱ्याला तात्काळ निवडणूक ड्युटीवरून काढून टाकण्यात आले आहे. तसेच कारसह सिंह यांना गुजरातमध्ये पुरवण्यात आलेल्या सर्व सरकारी सुविधा आयोगाकडून काढून घेण्यात आल्या आहेत. गुजरातमध्ये १ आणि ५ डिसेंबरला असं दोन टप्प्यांत मतदान होणार आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,951चाहतेआवड दर्शवा
1,976अनुयायीअनुकरण करा
52,500सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा