26 C
Mumbai
Wednesday, November 30, 2022
घरक्राईमनामास्कुल व्हॅन चालकाने विद्यार्थ्यांनीवर अतिप्रसंग करण्याचा केला प्रयत्न

स्कुल व्हॅन चालकाने विद्यार्थ्यांनीवर अतिप्रसंग करण्याचा केला प्रयत्न

व्हॅन चालकावर गुन्हा दाखल करून त्याला केली अटक

Google News Follow

Related

समस्त पालकवर्गाला चिंतेत टाकणारी घटना मुलुंडमध्ये घडली. मुलांना शाळेत आणि घरी ने -आन करणाऱ्या एका खाजगी स्कुल व्हॅन चालकाने ९ वर्षाच्या मुलीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केल्याची संतापजनक घटना गुरुवारी मुलुंड पश्चिम येथे घडली. या प्रकरणी मुलुंड पोलिसांनी व्हॅन चालकांवर गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. या घटनेमुळे पालकवर्गातचिंतेचे वातावरण पसरले आहे.

सूरज भालेराव असे अटक करण्यात आलेल्या खाजगी स्कुल व्हॅन चालकाचे नाव आहे. सूरज हा खाजगी शाळेच्या विद्यार्थ्यांना व्हॅन मधून ने -आन करण्याचे काम करतो. मुलुंड कॉलनी तील इयत्ता चौथीत शिकणारी विद्यार्थीनी खाजगी शाळेत असून ती सूरज याच्या व्हॅन मधून ये-जा करते.

हे ही वाचा:

श्रद्धाच्या आईच्या मृत्यू मागे आफताबचा खेळ?

शास्त्रज्ञाला दिली शिरच्छेदाची धमकी

ऍमेझॉन कंपनी करणार कर्मचारी कपात ?

सचिन वाझेला जामीन मंजूर, पण सुटका नाहीच

 

गुरुवारी सायंकाळी शाळा सुटल्यावर पीडित विद्यार्थीनी चालकाच्या शेजारच्या आसनावर बसून घरी येत असताना सूरज याने इतर विद्यार्थ्यांना घरी सोडल्यानंतर पीडित विद्यार्थिनी एकटीच असल्याचे बघून प्रवासादरम्यान त्याने तीला स्पर्श करून तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला, व तीला कोणाला सांगू नकोस अशी धमकी दिली.

घाबरलेल्या विद्यार्थीनीने घरी येताच तिच्यासोबत झालेला प्रसंग आईला सांगितला,आईने थेट मुलुंड पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. पोलिसांनी चालक सूरज भालेराव यांच्याविरुद्ध विनयभंग, धमकी देणे, व पोक्सोचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,950चाहतेआवड दर्शवा
1,976अनुयायीअनुकरण करा
52,500सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा