30 C
Mumbai
Saturday, April 27, 2024
घरक्राईमनामाश्रद्धाच्या आईच्या मृत्यू मागे आफताबचा खेळ?

श्रद्धाच्या आईच्या मृत्यू मागे आफताबचा खेळ?

विकास वालकर यांनी केला दावा

Google News Follow

Related

श्रद्धा वालकरच्या प्रकरणाचा अजून एक पान उलटले आहे. श्रद्धाच्या वडिलांनी नुकतीच शिवसेना नेता नीलम गोऱ्हे ह्यांची भेट घेतली. आफताब पूनावाला याच्याशी असलेल्या संबंधामुळे तिच्या आईच्या प्रकृतीवर परिणाम झाला व जानेवारी २०२० मध्ये तिचे निधन झाले, असे तिचे वडील म्हणाले.

श्रद्धाच्या वडिलांची भेट घेतल्यानंतर पत्रकारांशी बोलताना विधानपरिषदेच्या उपसभापती गोऱ्हे म्हणाल्या की, “आफताबसोबतच्या संबंधामुळे त्यांच्या मुलीवर दबाव असल्याचे कुटुंबीयांना जाणवले होते. परंतु तिच्यावर अत्याचार होत होता की आर्थिक चणचण होती हे त्यांना स्पष्ट झाले नव्हते “. गोऱ्हे यांनी विकास (श्रद्धांचे वडील) ह्यांच्या म्हणण्याचा दाखला देत सांगितले की श्रद्धाने आफताबसोबतच्या तिच्या भांडणाबद्दल सांगितलं पण तिने घरी परतण्यास नकार दिला. २०१९ च्या मध्यात श्रद्धा आफताबसोबत राहायला गेली होती. कॉलेजमध्ये, तिने मित्र आणि शिक्षकांना सांगितले होते की तिला वडील नाहीत. तिला तिच्या आई आणि लहान भावाचा उदरनिर्वाह करण्यासाठी काम करावे लागते. जेव्हा तिची आई वारली तेव्हा ती आफताबसोबत तिच्या घरी गेली होती आणि दोन आठवडे तिकडे राहिली होती.

हे ही वाचा:

वरळी कोळीवाड्यात दोन मुलांचा बुडून मृत्यू

ऍमेझॉन कंपनी करणार कर्मचारी कपात ?

राहुलजी आदरणीय महात्मा गांधींचे पत्र तुम्ही वाचले का ?

निवडणूक अधिकाऱ्याने इन्स्टाग्रामवर पोस्ट टाकली आणि बसला दणका

 

गोऱ्हे यांनी विकास ह्यांच्याशी केलेल्या संभाषणात असे बोलणे झाले की, आफताब मद्यपी होता आणि तो ड्रग्जही घेत असे. आफताबला फाशीची शिक्षा देण्याची मागणी करताना गोऱ्हे म्हणाल्या की, तिचे वडील दिल्ली पोलिसांनी प्रकरण हाताळत असल्याबद्दल समाधानी आहेत. गोऱ्हेनी प्रकरण उघडकीस आणल्याबद्दल आणि दिल्लीतील त्यांच्या समकक्षांना सहकार्य केल्याबद्दल माणिकपूर पोलिसांचे कौतुक ही केले. ही हत्या १८ मे रोजी झाली आणि आफताबला १२ नोव्हेंबरला अटक करण्यात आली.

गोऱ्हे म्हणाल्या की, या प्रकरणाच्या संदर्भात वडिलांना आवश्यक असलेली सर्व कायदेशीर मदत राज्य देईल. बुधवारी दिल्लीहून परतलेल्या विकास ह्यांनी आफताबला फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
149,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा