30 C
Mumbai
Saturday, April 27, 2024
घरराजकारणराहुलजी आदरणीय महात्मा गांधींचे पत्र तुम्ही वाचले का ?

राहुलजी आदरणीय महात्मा गांधींचे पत्र तुम्ही वाचले का ?

देवेंद्र फडणवीस यांचा राहुल गांधी यांच्यावर जोरदार ट्विट हल्ला

Google News Follow

Related

शेगावमध्ये राहुल गांधी यांची सभा सुरु होण्यास काही क्षण असताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका मागून एक ट्विट करत राहुल गांधी यांच्यावर तुफान हल्ला चढवला. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल राहुल गांधी केलेल्या विधानाच्या पार्श्वभूमीवर फडणवीस यांनी हे सर्व ट्विट केले आहेत. या ट्विटमध्ये फडणवीस यांनी म्हटले आहे की, राहुलजी,काल तुम्ही मला एका पत्राच्या शेवटच्या ओळी वाचायला सांगितले, चला, आज मी तुम्हाला काही कागदपत्रे वाचून दाखवतो. आमच्या आदरणीय महात्मा गांधींचे हे पत्र तुम्ही वाचले आहे का? त्यात त्याच शेवटच्या ओळी आहेत ज्या तुम्ही मला वाचायला दिल्या होत्या.

महात्मा गांधींचे जे पत्र फडणवीस यांनी ट्विट केले आहे त्यात शेवटी I beg to remain your royal highness faithful servant असे लिहिले आहे. त्याचा दाखला फडणवीस यांनी दिला. राहुल गांधी यांनी सावरकरांच्या पत्राचा उल्लेख करत त्यांनीही असे शब्द वापरल्याचे म्हटले होते आणि त्यावरून सावरकर हे इंग्रजांचे आपण नोकर आहोत, असे म्हणाल्याचा दावा केला होता. तशाच प्रकारचे शब्द महात्मा गांधी यांनीही वापरले असल्यामुळे आता गांधींजींबद्दलही राहुल गांधी यांची हीच भावना आहे का, असा सवाल फडणवीसांनी विचारला.

फडणवीस पुढील ट्विटमध्ये म्हणतात की, आता जरा भारताच्या माजी पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी (तुमच्या आजी) स्वातंत्र्यवीर सावरकरजींबद्दल काय म्हणाल्या होत्या…ते पण जरा वाचा. येथे त्या वीर सावरकरांना स्वातंत्र्य चळवळीचे आधारस्तंभ आणि भारताचे सदैव संस्मरणीय सुपुत्र असे म्हणाल्या होत्या. असे ट्विट करत फडणवीस यांनी राहुल गांधी यांचे या पत्राकडे लक्ष वेधले आहे. फडणवीस यांनी या पत्र सोबतच सावरकरांबाबतचे अनेक जुने संदर्भ देत राहुल गांधी यांनी हा जोरदार ट्विट हल्ला चढवला आहे .

महाराष्ट्राच्या राजकारणात विशेष स्थान असलेल्या वीर सावरकरांबद्दल शरद पवार काय म्हणतात ते फक्त वाचा आणि ऐका… या पत्रात त्यांनी दोन जन्मठेपेचा उल्लेख केला आहे. असे म्हणत फडणवीस यांनी जुन्या काळातील शरद पवार यांचे भाषण शेअर केले आहे. त्यापाठोपाठ फडणवीस यांनी माजी पंतप्रधान पी.व्ही.नरसिंह राव यांचा दाखला दिला आहे. काँग्रेसचे माजी नेते, देशाचे माजी पंतप्रधान पी.व्ही.नरसिंह राव म्हणतात की, स्वातंत्र्यवीर सावरकर हे प्रखर राष्ट्रवादी होते. त्यांची सामाजिक सुधारणेची बांधिलकी, आजच्या तरुण पिढीला ते शिकवण्याची ऊर्जा अशा अनेक मुद्द्यांवर ते काय बोलतात.. वाचा…असे फडणवीस यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. त्यानंतर आम्ही महाराष्ट्राचे आहोत, तर वाचा… काय म्हणतात काँग्रेसचे माजी नेते आणि गृहमंत्री बाळासाहेब देसाई… स्वातंत्र्यवीर सावरकरांची उत्कट देशभक्ती, त्यांचा अपार त्याग आणि सर्वांच्या मनात आदर, याशिवाय दुसरी कोणतीच भावना अशक्य आहे. भावना आहे त्यांच्यासाठी असणे अशक्य आहे याकडेही फडणवीस यांनी लक्ष्य वेधले आहे.

कम्युनिस्ट नेते श्रीपाद अमृत डांगे, महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री श्री यशवंतराव चव्हाण, इंडियन नॅशनल चर्चचे फादर विल्यम्स, माजी पंतप्रधान इंदिरा गांधी, तत्कालीन राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचे दाखले फडणवीस यांनी दिले आहेत. सोबतच या सर्व व्यक्तींनी सावरकर यांच्याबद्दल काढलेल्या गौरवोदगाराबद्दल वर्तमान पत्रातील कात्रणे तसेच अन्य संदर्भ दिले आहेत.

हे ही वाचा : 

कर्नाटक सरकारचा ‘गो रक्षणा’साठी मोठा निर्णय

मनसे उधळणार राहुल गांधींची शेगावमधील सभा

भारतात येणाऱ्या पर्यटकांमध्ये वाढ

आदित्य ठाकरेंच्या ड्रीम प्रकल्पांना स्थगिती

व्होट बँकेची काळजी करत आहात का?

आता प्रश्न असा पडतो की, वीर सावरकरांबद्दल वारंवार विधाने करून तुम्ही फक्त तुमच्या व्होट बँकेची काळजी करत आहात का? किंबहुना त्याची कितीही निंदा केली तरी कमी आहे… तसाच देश तुम्हाला नेहमीच विचारत आला आहे, तुम्ही अशाच निवडक गोष्टी वाचत राहिलात तर देश , अनेक पिढ्या तुम्हाला हा प्रश्न विचारत राहील, शेवटी तुम्हाला म्हणायचे काय आहे? असा प्रश्न फडणवीस यांनी शेवटी राहुल गांधी यांना विचारला आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
149,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा