27 C
Mumbai
Monday, November 28, 2022
घरविशेषवरळी कोळीवाड्यात दोन मुलांचा बुडून मृत्यू

वरळी कोळीवाड्यात दोन मुलांचा बुडून मृत्यू

समुद्रात पोहण्यासाठी पाच मुले गेली असता घडली ही दुर्दैवी घटना

Google News Follow

Related

वरळी कोळीवाडा येथे अत्यंत दु:खद घटना घडली आहे. समुद्रात पोहण्यासाठी गेलेली पाच मुले बुडाली. ही सर्व मुले हनुमान मंदिर येथील विकास गल्ली येथील होती. त्यातील दोन मुलांचा बुडून दुदैवी मृत्यू झाला आहे. वरळी येथील जेट्टीजवळ पोहत असताना अचानक समुद्राच्या पाण्याची पातळीत वाढ झाली. अचानक वाढत गेलेल्या पाण्यात ही मुलं बुडायला लागली आणि मदतीसाठी ओरडू लागली.

लगोलग स्थानिकांनी अग्निशमन दलाला पाचारण केले. अग्निशमन दलाची वाट न पाहता स्थानिकांनी समुद्रात उड्या घेऊन सर्व मुलांना वाचवण्याचा प्रयत्न केला गेला. बऱ्याच प्रयत्नानंतर पाच मुलांना वाचवण्यात स्थानिकांना यश आले. त्यानंतर वेळ न दवडता सर्व मुलांना रुग्णालयात दाखल केले गेले. यापैकी कार्तिकी पाटील ही मुलगी केईएम रुग्णालयात दाखल आहे. तर बाकींना हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

हेही वाचा :

सचिन वाझेला जामीन मंजूर, पण सुटका नाहीच

सावरकरांसाठी ठाकरे गट सत्ता सोडू शकत नाही

अटलबिहारी वाजपेयींच्या जीवनपटाचे शिवधनुष्य उचलले दिग्दर्शक रवी जाधव यांनी

दहशतवादाच्या आर्थिक मदतीच्या मुळावरच घाव घालणार

अग्निशमन दल घटनास्थळी पोहचण्यापूर्वी पाच मुलांना स्थानिकांनी वाचवले होते. त्यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात घेऊन गेले. अग्निशमन दलाने स्थानिकांकडे अजून कोणी हरवले का याची चौकशी केली असता, कोणीही हरवले नाही याची खात्री करून घेतली.

त्यातील हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आलेले कार्तिक चौधरी (वय ८) आणि सविता पाल (वय १२) या दोघांना डॉक्टरांनी मृत घोषित केले. तर आर्यन चौधरी (वय १०), ओम पाल (वय १४) या मुलांवर उपचार सुरू आहेत.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,952चाहतेआवड दर्शवा
1,975अनुयायीअनुकरण करा
52,400सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा