26 C
Mumbai
Wednesday, November 30, 2022
घरविशेषभारतात येणाऱ्या पर्यटकांमध्ये वाढ

भारतात येणाऱ्या पर्यटकांमध्ये वाढ

२०२१ मध्ये १५ लाख पर्यटक भारतात

Google News Follow

Related

भारतात येणाऱ्या पर्यटकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. भारतामध्ये मागील वर्षी १५ लाखाहून अधिक पर्यटक आल्याची माहिती गृहमंत्रालयाने दिली आहे. यामध्ये प्रामुख्याने ७४.३९ पर्यटक हे जगातील प्रमुख दहा देशांतील आहेत. तर उर्वरित २५.६१ हे अन्य देशातील असल्याचे गृहमंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीत म्हटले आहे.

२०२१ मध्ये कोरोना संबंधीचे निर्बंध असून देखील भारतात आलेल्या पर्यटकांची संख्या लक्षणीय आहे. यामध्ये प्रामुख्याने अमेरिकन पर्यटक आहेत. तसेच बांगला देशातील पर्यटकांची सुद्धा भारतात येण्याच्या संख्येत वाढ झाली आहे.

मार्च २०२० ते मार्च २०२२ मध्ये आंतरराष्ट्रीय विमान वाहतुकीवर देशात निर्बंध लावले होते. ऑक्टोबर २०२०मध्ये देशात जलमार्गे आणि हवाईमार्गे येणाऱ्या पर्यटकांवरील निर्बंध थोडे शिथिल करण्यात आले. त्यानंतर ऑक्टोबर २०२१ मध्ये टुरिस्ट विसाला परवानगी देण्यात आली. गृहमंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार, १५ लाख २४ हजार ४६९ पर्यटकांनी २०२१ मध्ये भारतात पर्यटन केले आहे.

दहा प्रमुख देशांतील पर्यटक संख्या

अमेरिका – ४ लाख २९ हजार ८६०

बांगलादेश – २ लाख ४० हजार ५५४

ब्रिटन – १ लाख ६४ हजार १४३

कॅनडा – ८० हजार ४३७

नेपाळ – ५२ हजार ५४४

अफगाणिस्तान – ३६ हजार ४५१

ऑस्ट्रेलिया – ३३ हजार ८६४

जर्मनी – ३३ हजार ७७२

पोर्तुगाल – ३२ हजार ०६४

फ्रान्स – ३० हजार ३७४

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,950चाहतेआवड दर्शवा
1,976अनुयायीअनुकरण करा
52,500सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा