30 C
Mumbai
Sunday, October 13, 2024
घरक्राईमनामातो ज्यूस मध्ये मिसळत होता 'मानवी मूत्र'

तो ज्यूस मध्ये मिसळत होता ‘मानवी मूत्र’

पोलिसांकडून अटक

Google News Follow

Related

गाझियाबादमधून एक धक्का दायक बातमी समोर आली आहे. आमीर खान नावाचा ज्यूस विक्रेता ग्राहकांना ज्यूसमध्ये लघवी मिसळून प्यायला देत असल्याचे समोर आले आहे. ज्यूस विक्रेत्याच्या कारण्याम्याची माहिती समजताच संतप्त लोकांनी आरोपी आमीर खान आणि एका सहकाऱ्याला बेदम मारहाण करत पोलिसांच्या स्वाधीन केले. लोकांनी दुकानात प्रवेश करताच प्लास्टिकच्या कॅनमध्ये एक लिटर लघवी आढळून आली. या प्रकरणी पोलिसांनी दुकानदार आमिर आणि त्याच्या साथीदाराला अटक केली आहे.

ही घटना गाझियाबादच्या लोनी पोलीस स्टेशन हद्दीतील इंदिरापुरी चौकीत घडली. येथेच आमिर खान नावाच्या मुस्लिम व्यक्तीचे ‘खुशी ज्यूस अँड शेक’ नावाचे दुकान आहे. रोजच्या प्रमाणे ग्राहकांनी ज्यूसची ऑर्डर दिली, यावेळी ज्युसचे सेवन करत असताना काही मुलांनी विचित्र असा गंध येत असल्याचे सांगितले. यावेळी एका व्यक्तीने दुकानात प्रवेश करून पहिले असता, एका प्लास्टिकच्या बॉटलमध्ये मानवी लघवी असल्याचे आढळून आहे.

यानंतर संतप्त लोकांनी आमिरला पकडून बेदम मारहाण केली. काही स्थानिक लोकांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली. लोणी पोलिसांनी घटनास्थळ गाठून आरोपीला अटक केली.पोलिसांनी झडती घेतली असता एका कॅनमध्ये मानवी मूत्र आढळून आले. आरोपी आमिरने आपला गुन्हा कबूल केला आणि माफीही मागितली, असे लोकांनी सांगितले. एसीपी भास्कर वर्मा यांनीही या घटनेला दुजोरा दिला आहे. आरोपीला अटक करण्यात आली असून पुढील कारवाई पोलीस करत आहेत.

हे ही वाचा : 

ज्ञानेश महारावांवर गुन्हा दाखल करा

पंतप्रधानांकडून झारखंड, ओडिशा, बिहार, यूपीसाठी ६ वंदे भारत ट्रेनला हिरवा झेंडा !

केजारीवालांना उपरती, देणार मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा !

राजस्थानच्या जहाजपुरमध्ये हिंदूंच्या मिरवणुकीवर मुस्लीम समुदायाकडून दगडफेक

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
182,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा