28 C
Mumbai
Wednesday, September 2, 2026
घरक्राईमनामाफटाक्याचा त्रास झाला म्हणून गणेश मिरवणुकीवर अंडी फेकली, आरोपी दानिशला अटक

फटाक्याचा त्रास झाला म्हणून गणेश मिरवणुकीवर अंडी फेकली, आरोपी दानिशला अटक

फटाक्यांच्या धुराचा रागातून कृत्य; तांत्रिक तपासातून आरोपीची ओळख

Google News Follow

Related

गणपती आगमन मिरवणुकीदरम्यान अंडी फेकून सार्वजनिक शांतता व सुव्यवस्थेला बाधा निर्माण केल्याप्रकरणी भायखळा पोलिसांनी २२ वर्षीय तरुणाला अवघ्या ३६ तासांत अटक केली. रानिश शेख खान असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. २३ ऑगस्ट रोजी माझगावचा मोरया गणपती मंडळाच्या श्रींच्या आगमन मिरवणुकीत हा प्रकार घडला होता.

मिरवणूक सुरू असताना अज्ञात व्यक्तीने वरून अंडी फेकल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या प्रकरणी भायखळा पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम २९९ आणि १९६ अन्वये गुन्हा दाखल केला. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तातडीने पाच तपास पथके तयार करून परिसरासह इतर ठिकाणी आरोपीचा शोध सुरू केला. तांत्रिक तपास आणि उपलब्ध पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी आरोपीची ओळख पटवली.

हे ही वाचा:

अमेरिका-कॅनडा व्यापारयुद्ध पेटले

अदानी एंटरप्राइझकडून मुंबई पोलिसांना १५ कोटींच्या गाड्या

ईटीपीएलमध्ये राहुल द्रविडची नवी इनिंग

गणेशोत्सवाला सावरायला हवं!

पोलिसांच्या तपासात रानिश हा ऑनलाइन ऑर्डरनुसार परिसरात अंडी घरपोच करण्याचा व्यवसाय करत असल्याचे समोर आले. घटनेच्या दिवशीही तो अंडी पोहोचवण्यासाठी रामभाऊ भोगले मार्गावरील एका इमारतीत प्रवेश करत होता. त्यावेळी गणपती मिरवणुकीत वाजवण्यात आलेल्या फटाक्यांच्या धुराचा त्याला त्रास झाला. या त्रासाचा राग मनात धरून त्याने मिरवणुकीच्या दिशेने अंडी फेकल्याचे तपासात निष्पन्न झाल्याचे पोलिसांनी सांगितले.

आरोपीला कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून संबंधित गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे. अटकेची कारवाई सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करून करण्यात आल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.

ही कारवाई मुंबईचे पोलीस आयुक्त देवेन भारती, पोलीस सहआयुक्त (का. व सु.) मनोजकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त मध्य प्रादेशिक विभाग विक्रम देशमाने आणि पोलीस उपायुक्त मध्य परिमंडळ-१ जयंत मीना यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. आग्रीपाडा विभागाचे सहायक पोलीस आयुक्त शशिकांत भोसले, भायखळा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपक सावंत तसेच गुन्हे प्रकटीकरण व एटीसी पथकातील अधिकाऱ्यांनी तपासात सहभाग घेतला.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
330,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा