राष्ट्रीय तपास यंत्रणा (NIA) पुन्हा एकदा ऍक्शन मोडमध्ये आली असून देशभरात ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’च्या (PFI) ठिकाणांवर छापेमारीचा सपाटा सुरु झाला आहे. तपास यंत्रणांकडून देशातील आठ राज्यांमध्ये छापेमारी सुरू आहे.
एनआयएने काही दिवसांपूर्वी संपूर्ण देशभरातील पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या ठिकाणांवर छापेमारी केली होती. या कारवाई दरम्यान अनेकांना ताब्यात घेण्यात आले होते. त्यानंतर करण्यात आलेलल्या चौकशीत अनेक गोष्टी समोर आल्या होत्या. त्यानंतर पुन्हा एकदा एनआयएने धाडसत्र सुरु केले आहे. आठ राज्यांमध्ये PFI च्या ठिकाणांवर छापे टाकण्यात येत आहेत. राज्यातून औरंगाबादमधून १२ जणांना, ठाण्यातून चार जणांना तर कल्याण भिवंडी आणि सोलापूरमधून प्रत्येकी एका संशयिताला ताब्यात घेण्यात आले आहे.
हे ही वाचा:
१० युट्यूब वाहिन्यांवरील ४५ व्हिडीओ हटवण्याचे केंद्र सरकारचे निर्देश
भुजबळ म्हणतात, सरस्वतीची नको, सावित्रीची पूजा करा
काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदाच्या शर्यतीतून मुख्यमंत्री अशोक गेहलोत बॅकफूटवर?
PFI च्या निशाण्यावर होते संघाचे मुख्यालय
एनआयएने यापूर्वी टाकलेल्या PFI च्या जागांवरील कारवाईनंतर मोठी माहिती समोर आली होती. पीएफआयच्या रडारवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपचे अनेक बडे नेते होते. यासोबतच नागपूरचे युनियनचे मुख्यालयही त्यांच्या निशाण्यावर होते, अशी माहिती तपास यंत्रणांनी दिली होती. तसेच PFI कडून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नागपूर मुख्यालयाची सर्व माहितीही गोळा करण्यात आली होती. दसऱ्या दिवशी आरएसएसच्या कार्यालयात कार्यक्रम होतो याबाबत सर्व माहिती गोळा केली होती.







