30 C
Mumbai
Tuesday, September 15, 2026
घरक्राईमनामा३१ बांगलादेशी नागरिकांवर कारवाई; हद्दपारीसाठी मालदाला रवाना

३१ बांगलादेशी नागरिकांवर कारवाई; हद्दपारीसाठी मालदाला रवाना

बंगळुरूत पोलिसांचे ‘ऑपरेशन मुक्ता’

Google News Follow

Related

बंगळुरू पोलिसांनी बेकायदा स्थलांतरितांविरोधातील कारवाई तीव्र केली असून शहरातील १० वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांनी ताब्यात घेतलेल्या ३१ बांगलादेशी नागरिकांना हद्दपारीच्या प्रक्रियेसाठी पश्चिम बंगालमधील मालदा येथे रवाना करण्यात आलं आहे. सोमवारी (३१ ऑगस्ट) सकाळी त्यांना एसएमव्हीटी बंगळुरू रेल्वे टर्मिनलवरून पोलिसांच्या बंदोबस्तात रेल्वेने पाठवण्यात आलं.

या ३१ जणांसोबत २० पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. एसएमव्हीटी बंगळुरू स्थानकावरही कडेकोट सुरक्षा व्यवस्था करण्यात आली होती. सर्वांना रेल्वेत बसवल्यानंतर पोलीस पथक त्यांच्या सोबत मालदापर्यंत रवाना झालं. हे पथक मंगळवारी सायंकाळी सुमारे ५ वाजता मालदा रेल्वे स्थानकावर पोहोचण्याची शक्यता आहे. मालदाला पोहोचल्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांकडून हद्दपारीची पुढील प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. बंगळुरू पोलिसांकडून शहरात बेकायदा पद्धतीने वास्तव्य करणाऱ्या परदेशी नागरिकांचा शोध घेण्यासाठी कारवाई सुरू आहे.

हे ही वाचा:

नेपाळमधील मृतांचा आकडा ८०० पार; ३ हजारांहून अधिक बेपत्ता

इराण-अमेरिका संघर्षाचा बाजाराला फटका; सेन्सेक्स-निफ्टीची घसरणीसह सुरुवात

जॉर्डनमधील दोन अमेरिकी तळांवर इराणकडून क्षेपणास्त्र हल्ले

अंकित बालियान हत्या प्रकरणातील दोन शुटर्स एन्काऊंटरमध्ये ठार

बंगळुरू पोलीस आयुक्त सीमांत कुमार सिंह यांनी नागरिकांना शहरात बेकायदा पद्धतीने वास्तव्य करणाऱ्या व्यक्तींबाबत माहिती असल्यास ती पोलिसांना देण्याचं आवाहन केलं आहे. मात्र, संशयित व्यक्तींविरोधात नागरिकांनी स्वतःहून कायदा हातात घेऊ नये, असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, ‘ऑपरेशन मुक्ता’ अंतर्गत बंगळुरूमध्ये बेकायदा स्थलांतरितांची ओळख पटवून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मोहीम सुरू आहे. इलेक्ट्रॉनिक सिटी विभागाचे डीसीपी एम. नारायण यांनी ३१ जणांना मालदाला पाठवण्यात आल्याची माहिती दिली आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
333,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा