28 C
Mumbai
Friday, August 6, 2021
घरक्राईमनामाअश्लिल चित्रपटनिर्मितीप्रकरणी राज कुंद्रा अटकेत

अश्लिल चित्रपटनिर्मितीप्रकरणी राज कुंद्रा अटकेत

Related

प्रसिद्ध सिनेअभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती आणि उद्योगपती राज कुंद्राला सोमवारी रात्री उशिरा अश्लिल चित्रपटांच्या निर्मितीच्या आरोपाखाली अटक करण्यात आली.

मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कुंद्राविरुद्ध काही पुरावे सापडले असून त्याने काही अश्लिल चित्रपटांची निर्मिती केली असून मोबाईलवर ते चित्रपट दाखविले गेले आहेत.

यावर्षी फेब्रुवारी महिन्यात त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. याच प्रकरणात त्याला मुख्य आरोपी म्हणून त्याला अटक करण्यात आली आहे. फेब्रुवारी महिन्यात मुंबई गुन्हे शाखेने त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. अशा अश्लिल चित्रपटांची निर्मिती आणि काही अपच्या माध्यमातून त्यांचे प्रदर्शन करण्याच्या आरोपाखाली हा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

हे ही वाचा :

केरळमध्ये ईद साजरी करताना कोरोनाचा धोका नाही

लखनौ विद्यापीठात विद्यार्थी गिरवणार सावरकरांच्या विचारांचे धडे

ठाणे जिल्ह्यात वाहून गेलेल्या पाचपैकी एकाचा मृत्यू 

बापरे! कळव्यात दरड कोसळली; एकाच घरातील पाच जण दगावले

पोलिसांनी म्हटले आहे की, आमच्याकडे पुरेसे पुरावे आहेत आणि या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. गुन्हे अन्वेषण शाखेने बराच वेळ कुंद्राची चौकशी केली. त्याला चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. त्यानंतर त्याला अटक करण्यात आली.

राज कुंद्रा याआधीही अनेकवेळा वादात सापडलेला आहे. मॉडेल पूनम पांडेने आपल्या छायाचित्रांचा गैरवापर केल्याप्रकरणी राज कुंद्रावर आरोप केले होते. पण कुंद्राने आपला याच्याशी काडीचाही संबंध नसल्याचे सांगून आरोप फेटाळले होते.

https://twitter.com/ANI/status/1417173746247344128?s=20

https://twitter.com/ANI/status/1417177425021046784?s=20

कुंद्रावर फसवणूक, सार्वजनिक ठिकाणी अश्लिल कृत्य करणे, अश्लिल पुस्तके व साहित्य यांचे प्रदर्शन व विक्री करणे या आधारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राज कुंद्रा आणि शिल्पा शेट्टी यांचा विवाह २००९मध्ये झाला आहे. २०१२मध्ये त्यांना मुलगा झाला. त्याचे नाव विआन आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

2,721चाहतेआवड दर्शवा
1,319अनुयायीअनुकरण करा
2,170सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा