पियूष मिश्रा हा जबरदस्त गीतकार आहे. कम्युनिस्टोने तो मेरी जिंदगी खराब कर दी… हे त्याचे विधान प्रचंड गाजले आहे. सध्या झारखंडमध्ये सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनाबाबत त्यांचा एक प्रश्न गाजतो आहे. हा प्रश्न त्याने जेष्ठ अभिनेते, मुघलांचे प्रशंसक, घनघोर मोदी विरोधक नसीरुद्दीन शहा यांना केला असला तरी तो विरोधी पक्षनेते राहुल गांधी, कॉकरोच अभिजीत दिपके, महाराष्ट्रातील एका पडीक अभिनेत्री आणि पार्टटाईम कवयित्री यांच्यासह अनेकांना लागू आहे. नसीरुद्दीन यांनी नीट पेपरफुटी प्रकरणी गप्प बसलेल्या बॉलिवूडच्या कलाकारांना फटकारताना विधान केले होते, जिन कुत्तो के मुंह मे हड्डी है, उनकी आवाज बंद है… ते स्वत: मात्र झारखंड विद्यार्थी आंदोलनप्रकरणी तंबाखूची मळी भरल्यासारखे गप्प होते. त्यांना पियूष मिश्राने विचारले प्रतिप्रश्न केला, इस वक्त वो कौन कुत्ते है जिन के मुह मे हड्डी है ? झारखंडच्या विद्यार्थ्यांना पाठिंबा देण्यासाठी पियूष मिश्रा स्वत: तिथे गेले, त्यांनी विद्यार्थ्यांशी चर्चा केली. त्यांना पाठिंबा दिला. तिथे त्यांनी जो प्रश्न सध्या उर्दूमध्ये शिव्या घालण्याचा शौक जडलेल्या नसीरुद्दीन शहा यांना केला, तो केवळ शहा यांच्या पुरता मर्यादीत नाही. अनेकांना हा प्रश्न झोंबणार आहे. मिश्रा यांच्या या प्रश्नाने अनेकांची बिन पाण्याने हजामत करून टाकली आहे. संसदेवर मोर्चा नेणाऱ्या कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलकांवर झालेल्या लाठीमाराचे निमित्त करून विरोध पक्षनेते राहुल गांधी यांनी संपूर्ण पावसाळी अधिवेशनात धिंगाणा घातला. झारखंडमध्ये जिथे राहुल गांधी यांचा पक्ष सरकारमध्ये सामील आहे, तिथे विद्यार्थ्यांवर झालेल्या अमानुष लाठीमाराबाबत मात्र ते गप्प राहीले. कॉकरोच अभिजीत दिपकेही मूग गिळून बसला. नीट पेपरफुटीशी संबंधित ज्या मागण्या मोदी सरकारने मान्य केल्या, त्याच मागण्यांना झारखंडमधील हेमंत सोरेन सरकारने वाटाण्याच्या अक्षता लावल्या. गृहमंत्री अमित शहा संसदेत या विषयावर निवेदन करणार, असे जाहीर झाल्यानंतर राहुल गांधी यांनी तिथेही पळपुटेपणा दाखवला. विद्यार्थी प्रेमाचे फक्त नाटक होते, खरा धंदा मोदी विरोधाचाच होता. राहुल गांधी आणि अभिजीत दिपके हे दोघेही दोघेही उघडे पडले आहेत.



