28 C
Mumbai
Thursday, August 18, 2022
घरक्राईमनामानुपूर शर्मांचे शीर कापणाऱ्यास घर देण्याची भाषा करणाऱ्या सलमान चिश्तीला अटक

नुपूर शर्मांचे शीर कापणाऱ्यास घर देण्याची भाषा करणाऱ्या सलमान चिश्तीला अटक

Related

अजमेरमधील ख्वाजा गरीब नवाज दर्गाचे खादिम सलमान चिश्तीला अजमेर पोलिसांनी अखेर अटक केली आहे. अजमेर शरीफ दरगाहचा खादिम असलेला सलमान चिश्ती याने व्हिडिओ करत नुपूर शर्मा यांना गोळी मारण्याची धमकी दिली होती तसेच जो कुणी नुपूर शर्मा यांचे शीर कापून आणून देईल त्याला घर बक्षीस दिले जाईल, अशी घोषणा केली होती. त्यानंतर सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट अपलोड केल्याप्रकरणी पोलिसांनी सलमान चिश्तीला अटक केली आहे.

सलमान चिश्ती याने नुपूर शर्मा यांची हत्या करणाऱ्याला घर देणार असल्याचे जाहीर केले होते. या व्हिडिओत तो हत्येची चिथावणी देताना नशेत असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला होता. त्यामुळे त्याने दिलेली ही धमकी नशेच्या अधीन होऊन दिलेली आहे, असे म्हणत या घटनेवर पांघरूण घालण्याचा प्रयत्न पोलिस करत असल्याचा आरोप करण्यात येत होता. अखेर पोलिसांनी सलमान चिश्तीला अटक केली असून त्याची कसून चौकशी सुरू आहे, अशी माहिती अतिरिक्त पोलीस अधीक्षक विकास सांगवान यांनी दिली.

हे ही वाचा:

ब्रिटनच्या आरोग्य सचिव, अर्थमंत्र्यांनी दिला राजीनामा

रिक्षाच्या स्पीडपुढे मर्सिडिजचा स्पीड फिका पडला…

उद्धवजी, मुर्मूना पाठिंबा द्या! खासदार राहुल शेवाळे यांचा लेटरबॉम्ब

वीर सावरकरांचे विचार आम्हाला महाविकास आघाडीत असताना मांडता येत नव्हते!

सलमान चिश्तीविरोधात १३ गुन्हे दाखल असून अजमेर पोलिसांनी चिश्ती विरोधात गुन्ह्याची नोंद केली आहे. पोलिसांनी तपासासाठी तीन पथके तयार केली आहेत. चिश्तीच्या घरासह त्याच्याशी संबंधित इतर ठिकाणांवर छापेमारी केली आहे. अजमेर ख्वाजा गरीब नवाज दर्गामध्ये आरोपी सलमान काम करत होता. सोशल मीडियावर चिथावणीखोर आणि वादग्रस्त पोस्ट करून सामाजिक सलोखा बिघडवल्याच्या आरोपाखाली ही अटक करण्यात आली.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,912चाहतेआवड दर्शवा
1,918अनुयायीअनुकरण करा
23,600सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा