जम्मू- काश्मीरच्या अनंतनाग येथील माजी सरकारी डॉक्टर आदिल अहमद राथेर याच्या लॉकरमधून एके- ४७ रायफल सापडल्याने खळबळ उडाली आहे. आदिल याने २४ ऑक्टोबर २०२४ पर्यंत जीएमसी अनंतनाग येथे सेवा बजावली. तो अनंतनागमधील जलगुंड येथील रहिवासी आहेत. या प्रकरणी नौगाम पोलिस ठाण्यात भारतीय दंड संहितेच्या विविध कलमांखाली आणि बेकायदेशीर क्रियाकलाप (प्रतिबंध) कायदा (UAPA) अंतर्गत एफआयआर क्रमांक १६२/२०२५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस आणि तपास यंत्रणा या प्रकरणाचा गांभीर्याने तपास करत आहेत.
आदिल अहमद राथेर याच्यावर असे शस्त्र बाळगल्याबद्दल आणि दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी असण्याची शक्यता असल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस त्याच्या ताब्यातून जप्त केलेली शस्त्रे आणि इतर पुरावे तपासात आहेत. यानंतर दोषींवर कठोर कारवाई केली जाईल.
हे ही वाचा:
‘या’ कालावधीत होणार संसदेचे हिवाळी अधिवेशन
शिक्षिकेचे तक्रारीकडे दुर्लक्ष आणि नऊ वर्षांच्या मुलीची आत्महत्या; नेमकं प्रकरण काय?
आशिया कप ट्रॉफीचा मुद्दा सोडवण्यासाठी आयसीसीकडून समिती स्थापन
पश्चिम आफ्रिकन देश असलेल्या मालीमध्ये पाच भारतीय नागरिकांचे अपहरण
एका डॉक्टरच्या लॉकरमधून एके- ४७ रायफल जप्त होणे ही सुरक्षा दलांसाठी एक मोठी कामगिरी मानली जात आहे. अशा घटना दर्शवतात की अशी शस्त्रे सुरक्षित ठिकाणी कशी लपवली जाऊ शकतात. सध्या ही रायफल श्रीनगर पोलिसांनी जप्त करत आरोपीला ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी सविस्तर चौकशी सुरू केली आहे. तपासात डिजिटल आणि भौतिक पुरावे गोळा केले जात आहेत. या प्रकरणामुळे राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था आणि सुरक्षेला गंभीर धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे, पोलीस अतिदक्षतेवर आहेत तसेच दहशतवादी समर्थकांना पकडण्यासाठी कठोर पावले उचलली जात आहेत.







