28 C
Mumbai
Friday, July 24, 2026
घरक्राईमनामाशिवसेनेचे उपसभापती सचिन अहिर यांच्या घरात अडीच कोटींची चोरी

शिवसेनेचे उपसभापती सचिन अहिर यांच्या घरात अडीच कोटींची चोरी

दागिने, रोकड चोरी; घरकाम करणाऱ्यांवर संशय

Google News Follow

Related

शिवसेनेचे विधान परिषदेचे उपसभापती सचिन अहिर यांच्या वरळी सी-फेस येथील ‘गुलरुख’ इमारतीमधील निवासस्थानातून गेल्या पाच वर्षांत तब्बल २ कोटी ६५ लाख रुपयांच्या मौल्यवान वस्तू चोरीला गेल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी सचिन अहिर यांचे पुत्र कृष्णा अहिर यांनी वरळी पोलिसांकडे अधिकृत तक्रार नोंदवली आहे. सध्या या खळबळजनक प्रकरणाचा तपास मुंबई गुन्हे शाखेच्या (क्राईम ब्रँच)कडे सोपवण्यात आला आहे.

चोरीला गेलेल्या मौल्यवान वस्तू:

सोने व हिरे: १०० ग्रॅम सोन्याचे बिस्किट, हिऱ्यांनी जडवलेल्या सोन्याच्या बांगड्या व अंगठ्या, तसेच पाच हिऱ्यांचे हार.
चांदीच्या वस्तू: चांदीचे पेले आणि जग, ताट, लोट्यांसह विविध चांदीची भांडी.
रोकड: आगीच्या दुर्घटनेत नष्ट झाल्याचा संशय असलेली अज्ञात मोठी रोकड.

हे ही वाचा:

सौदी राजपुत्राच्या मृत्यूचं गूढ अखेर उलगडले

फिटनेसपलीकडे वेलनेसचा नवा ट्रेंड

कॉक्रोच जनता पार्टीचे २४ जुलै रोजी देशव्यापी आंदोलन

पन्नूसोबत चर्चेनंतर दिपकेला भरला ताप

सीसीटीव्ही फुटेजमुळे फुटले बिंग….

तक्रारदार कृष्णा यांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या ऑक्टोबर २०२५ रोजी घरात कथित शॉर्ट सर्किटमुळे आग लागली होती, ज्यामुळे घराचे मोठे नुकसान झाले होते. सुरुवातीला कुटुंबाला घरखर्चासाठी ठेवलेली रोकड याच आगीत जळून खाक झाल्याचे वाटले. परंतु, घटनेनंतर घरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, रेकॉर्डिंगमधील काही महत्त्वाचे भाग गायब असल्याचे आढळून आले. यामुळे कुटुंबाचा संशय बळावला. कसून तपासणी केल्यानंतर, गेल्या पाच वर्षांत त्यांच्या घरी काम करणाऱ्या चार घरगुती नोकरांनी संगनमताने पद्धतशीरपणे ही कोट्यवधींची चोरी केल्याचे समोर आले.

चित्रपटातील कामामुळे खारमध्ये वास्तव्य

कृष्णा अहिर हे चित्रपटसृष्टीतील कामाच्या व्यस्ततेमुळे गेल्या दोन वर्षांपासून खार येथील एका फ्लॅटमध्ये राहत होते. मात्र, वरळी सी-फेसवरील मूळ घरी त्यांचे आई-वडील आणि बहीण राहत असल्याने ते सतत आपल्या घरी ये-जा करत असत. या घरगुती नोकरांनी याच विश्वासाचा गैरफायदा घेऊन टप्प्याटप्प्याने हा माल लांबवल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. गुन्हे शाखा या प्रकरणी अधिक कसून चौकशी करत आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
322,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा