29.1 C
Mumbai
Saturday, October 31, 2026
घरराजकारणकॉक्रोच जनता पार्टीचे २४ जुलै रोजी देशव्यापी आंदोलन

कॉक्रोच जनता पार्टीचे २४ जुलै रोजी देशव्यापी आंदोलन

शांततापूर्ण निदर्शनांचे आवाहन

Google News Follow

कॉकरोच जनता पार्टी (CJP) ने शुक्रवार, २४ जुलै रोजी देशव्यापी आंदोलनाची हाक दिली असून, समर्थक, विद्यार्थी संघटना आणि नागरी समाज गटांना अलीकडील आंदोलनांदरम्यान कथित पोलिस अत्याचाराचे बळी ठरलेल्यांच्या समर्थनार्थ देशभरातील प्रत्येक जिल्ह्यात शांततापूर्ण निदर्शने करण्याचे आवाहन केले आहे.

सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टरमध्ये सीजेपीने “प्रत्येक जिल्हा. एक दिवस. एकच मागणी.” या घोषवाक्याखाली देशभरातील नागरिकांना आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.

पक्षाने समर्थकांना प्रत्येक जिल्ह्यात शांततापूर्ण निदर्शने आयोजित करण्यास आणि पोलिस कारवाईचा कथित फटका बसलेल्या लोकांप्रती एकजूट व्यक्त करण्याचे आवाहन केले आहे. आंदोलनादरम्यान निश्चित केलेल्या ठिकाणी एकत्र जमून उपस्थितांसमोर विद्यार्थ्यांच्या मागण्या वाचून दाखवाव्यात, असेही पक्षाने म्हटले आहे.

सीजेपीने आंदोलनाच्या आयोजकांसाठी स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसीजर (SOP), प्रचार साहित्य आणि निवेदनाचा नमुना देखील जारी केला आहे. स्थानिक आयोजकांनी विद्यार्थी संघटना आणि इतर संस्थांशी समन्वय साधावा, आवश्यक परवानग्या घ्याव्यात आणि आंदोलन पूर्णपणे शांततेत पार पडेल याची खात्री करावी, असे निर्देश देण्यात आले आहेत.

हे ही वाचा:

‘पळू नका राहुल गांधी, संसदेत चर्चेसाठी हिंमत दाखवा!’

विद्यार्थ्याला खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी महागात

उत्तर भारतापासून दक्षिण कोरियापर्यंत १० हजार किमीचा ढग??

पश्चिम आशियातील युद्धाचा जागतिक अर्थव्यवस्थेवर घाला

 

आंदोलनासाठी मार्गदर्शक सूचना

पक्षाने आयोजकांना विद्यार्थ्यांच्या मागण्या सार्वजनिकरीत्या वाचून दाखवण्यास, कथित पोलिस अत्याचारग्रस्तांशी ऐक्य व्यक्त करण्यास आणि निदर्शनांनंतर संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यास सांगितले आहे.

दिल्लीतील जंतर-मंतर येथे सुरू असलेल्या कथित NEET-UG २०२६ प्रश्नपत्रिका फुटीप्रकरणाविरोधातील आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सीजेपीने देशव्यापी आंदोलनाची ही घोषणा केली आहे.

दरम्यान, केंद्र सरकारने सीजेपीशी चर्चेची ऑफर पुन्हा दिली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, NEET-UG २०२६ प्रश्नपत्रिका फुटीच्या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी केंद्र सरकार संसदेतील विविध पक्षांच्या नेत्यांची बैठक बोलावू शकते. राजीनाम्यांसारख्या कोणत्याही पूर्वअटींशिवाय चर्चा करण्यास सरकार तयार असल्याचे विरोधी पक्षांना सांगण्यात आल्याचे वृत्त आहे.

यापूर्वी गुरुवारी केंद्रीय आरोग्यमंत्री जेपी नड्डा यांनी सरकार चर्चेसाठी तयार असल्याचे पुन्हा स्पष्ट केले.

“होय, आम्ही सीजेपीशी चर्चा करण्यास तयार आहोत,” असे नड्डा म्हणाले. त्यांनी सीजेपीच्या प्रतिनिधींना त्यांच्या अधिकृत निवासस्थानी किंवा कार्यालयात भेटण्याचे निमंत्रण दिले.

मात्र, सीजेपीने चर्चा जंतर-मंतर येथे किंवा त्याच्या परिसरातच व्हावी, अशी भूमिका कायम ठेवली असून सरकारने सुचवलेले ठिकाण नाकारले आहे.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
340,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा