अमेरिकन डॉक्टरकडे आढळला भारतात बंदी असलेला सॅटेलाइट फोन

पुद्दुचेरी विमानतळावर तपासादरम्यान उघडकीस आली बाब

अमेरिकन डॉक्टरकडे आढळला भारतात बंदी असलेला सॅटेलाइट फोन

पुद्दुचेरी विमानतळावर एका डॉक्टर महिलेला सॅटेलाइट फोन बाळगल्याबद्दल विमानात प्रवेश करण्यापासून रोखण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या महिला डॉक्टर काही डॉक्टरांना भेटायला म्हणून आल्या होत्या. त्या परतत असताना ही घटना घडली. इरिडीयमचा एक सॅटेलाइट फोन त्यांच्याकडे असल्याचे लक्षात येताचं त्यांना अडवण्यात आले.

अमेरिकेतील नेत्ररोगतज्ज्ञ (ophthalmologist) राचेल अ‍ॅन स्कॉट या ३२ वर्षीय महिला डॉक्टर आपला सॅटेलाइट फोन घेऊन पुद्दुचेरी विमानतळावर पोहचल्या. मात्र त्यांच्याकडे सॅटेलाइट फोन असल्याचे लक्षात येताच त्यांना विमानात चढण्यापासून रोखण्यात आले. या डॉक्टर अरविंद आय हॉस्पिटलमधील डॉक्टरांना भेटण्यासाठी म्हणून आल्या होत्या. त्यांच्याकडे चांदीच्या रंगाचा सॅटेलाइट फोन असल्यची माहिती आहे. यापूर्वी त्यांनी तामिळनाडूतील मदुराई आणि इतर अनेक ठिकाणांना भेट दिली होती ज्याबद्दल अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

विमानतळ अधिकाऱ्यांनी शोध घेतल्यानंतर आणि सॅटेलाइट फोन सापडल्यानंतर त्यांना हैदराबादला जाणाऱ्या विमानात चढण्यापासून रोखण्यात आले. तसेच या प्रकरणी लासपेट पोलिसांना कळवण्यात आले आणि त्यांनी तपास सुरू केला आहे. दूरसंचार विभागाच्या (DoT) पूर्वपरवानगीशिवाय थुराया आणि इरिडियम सारखे सॅटेलाईट फोन भारतात बंदी आहेत. त्यामुळे खळबळ उडाली आहे.

हे ही वाचा : 

मंत्री विजय शाह यांच्या वादग्रस्त विधानाच्या चौकशीसाठी एसआयटी

बोरिवलीत दोन कुटूंबात तुफान हाणामारी, ३ ठार!

हेरगिरी प्रकरणातील ज्योती मल्होत्राचे इंस्टाग्राम अकाउंट ब्लॉक

संतापजनक! दहशतवादी खालिदवर पाकच्या ध्वजासह शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

३० जानेवारी २०२५ रोजी, नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (DGCA) भारतात उड्डाण करणाऱ्या सर्व विमान कंपन्यांना विमानात ही बंदी जाहीर करण्याचे आणि परदेशातील कार्यालये आणि विमानात मासिकांद्वारे प्रवाशांना माहिती देण्याचे निर्देश दिले. परदेशी नागरिकांसह प्रवाशांनी लेखी परवानगीशिवाय अशी उपकरणे बाळगू नयेत किंवा वापरू नयेत कारण अनधिकृत सॅटेलाइट फोन जप्त केले जातील आणि वाहकांना कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागू शकते, अशा सूचना आहेत. यूकेने अलीकडेच त्यांच्या प्रवास सल्लागारात सुधारणा केली आहे, ज्यामध्ये नागरिकांना भारतात सॅटेलाइट फोन बाळगल्याबद्दल दंड किंवा अटक होऊ शकते असा इशारा देण्यात आला आहे.

Exit mobile version