देशविरोधी कारवाया आणि आयएसआय एजंटशी असलेल्या संबंधांप्रकरणात हरियाणामधील ट्रॅव्हल ब्लॉगर ज्योती मल्होत्रा हिला शनिवारी अटक करण्यात आली. यानंतर ज्योती हिचे इंस्टाग्राम अकाउंट ब्लॉक करण्यात आले आहे. यानंतर ज्योती मल्होत्राचे युट्युब चॅनल आणि फेसबुक अकाउंटही ब्लॉक होण्याच्या मार्गावर आहे.
ज्योतीच्या अटकेनंतर, इंस्टाग्रामवर तिच्या फॉलोअर्सची संख्या ७,००० हून अधिक झाली आणि अटक झाल्यानंतर २४ तासांच्या आत एक लाखाहून अधिक लोकांनी तिला गुगलवर शोधले. मल्होत्रा हिचे “ट्रॅव्हल विथ ज्यो” हे यूट्यूब चॅनल आहे ज्याचे ३.७७ लाख सबस्क्राइबर्स आहेत. रविवारी पोलिसांनी उघड केले की, भारत आणि पाकिस्तानमधील चार दिवसांच्या संघर्षादरम्यान ज्योती सीमेपलीकडून तिच्या हँडलर्सच्या संपर्कात होती, परंतु तिच्याकडे संरक्षणाशी संबंधित कोणतीही गुप्तचर माहिती उपलब्ध नव्हती. पाकिस्तानी एजंटांनी तिला देशाचे सकारात्मक चित्र रंगवण्यास सांगितले होते, अशी माहिती आहे.
देशविरोधी कारवाया आणि आयएसआय एजंटशी असलेल्या संबंधांप्रकरणात ट्रॅव्हल ब्लॉगर ज्योती मल्होत्रा हिला अटक करण्यात आली. तिच्या पाकिस्तान भेटीदरम्यान पाकची गुप्तचर संस्था आयएसआयच्या एजंटशी संबंध निर्माण झाले होते. ज्योती मल्होत्रा हिने २०२३ मध्ये पाकिस्तानला भेट दिली होती. कमिशनद्वारे व्हिसा मिळवून ही भेट केली होती. या काळात ज्योतीची भेट पाकिस्तान उच्चायोगातील कर्मचारी एहसान-उर-रहीम उर्फ दानिशशी झाली, ज्याच्याशी तिचे घनिष्ठ संबंध निर्माण झाले. दानिशच्या माध्यमातून ज्योतीची ओळख पाकिस्तानी गुप्तचर संस्थेच्या इतर एजंट्सशी झाली, ज्यात अली अहसान आणि शाकीर उर्फ राणा शाहबाज यांचा समावेश होता. पुढे ज्योती व्हॉट्सअप, टेलिग्राम आणि स्नॅपचॅट सारख्या एन्क्रिप्टेड प्लॅटफॉर्मद्वारे या एजंट्सच्या संपर्कात राहिली. ती सोशल मीडियावरही पाकिस्तानच्या बाजूने सकारात्मक प्रतिमा सादर करत होती, असे आढळून आले होते.
हे ही वाचा :
“पाकने सुवर्ण मंदिरावर डागली होती क्षेपणास्त्र, पण…” काय म्हणाले लष्कर अधिकारी?
जम्मू- काश्मीरच्या शोपियानमध्ये दहशतवाद्यांच्या दोन साथीदारांना अटक
हैदराबादमध्ये बॉम्बस्फोटाचा कट उधळला; आयसिसशी संबंधित दोघांना अटक
पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याबद्दल उत्तर प्रदेशातील व्यावसायिकाला अटक
ज्योती हिचे एका पाकिस्तानी गुप्तचर एजंटसोबत प्रेमसंबंध होते आणि ती अलीकडेच त्याच्यासोबत इंडोनेशियातील बाली येथे गेली होती, असेही उघड झाले. दरम्यान, भारत सरकारने १३ मे २०२५ रोजी डॅनिशला ‘पर्सोना नॉन ग्राटा’ घोषित केले आणि त्याला देश सोडण्याचे आदेश दिले. त्याच वेळी, ज्योती मल्होत्रा हिच्या विरोधात भारतीय दंड संहिता (BNS) च्या कलम १५२ आणि अधिकृत गुपिते कायदा, १९२३ च्या कलम ३, ४ आणि ५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
