तेलंगणा पोलिस आणि आंध्र प्रदेश पोलिस यांनी केलेल्या संयुक्त कारवाईत हैदराबादमध्ये बॉम्बस्फोटाचा कट उधळून लावण्यात आला आहे. शहरात बॉम्बस्फोट घडवून आणण्याच्या संशयावरून दोन जणांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिराज उर रहमान (वय २९ वर्षे) आणि सय्यद समीर (वय २८ वर्षे) यांना अटक करण्यात आली आहे. हे दोघेही सौदी अरेबियातील आयसिस मॉड्यूलशी संबंधित असल्याचा संशय आहे.
स्फोट घडवून आणण्याच्या योजनेचा भाग म्हणून सिराज याने विजयनगरममध्ये स्फोटके खरेदी केली होती, अशी माहिती आहे. या दोघांना सौदी अरेबियातील एका आयसिस मॉड्यूलकडून सूचना मिळाल्या होत्या, जो त्यांना हैदराबादमध्ये हल्ले करण्यासाठी मार्गदर्शन करत होता. या संयुक्त कारवाईत तेलंगणा काउंटर इंटेलिजेंस आणि आंध्र प्रदेश इंटेलिजेंसचा समावेश होता. या संयुक्त कारवाईत पहिले सिराज याला आंध्र प्रदेशातील विजयनगर येथून अटक केली. त्यानंतर रहमानने पोलिसांना माहिती दिली आणि दुसऱ्या संशयिताला हैदराबाद येथून अटक करण्यात आली, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. संशयितांच्या परिसरातून पोलिसांनी अमोनिया, सल्फर आणि अॅल्युमिनियम पावडरसह स्फोटके जप्त केली आहेत. अटक केलेले दोघे सध्या कोठडीत असून लवकरच त्यांना न्यायालयात हजर केले जाईल, असे पोलिसांनी सांगितले.
हे ही वाचा :
बांगलादेश: शेख हसीना यांची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्रीला अटक!
पाकिस्तानकडून भारताची पुन्हा नक्कल, शिष्टमंडळ पाठवणार परदेशात !
ऑपरेशन सिंदूरच्या यशानिमित्त दिल्लीत भव्य ‘तिरंगा यात्रा’
लष्कर-ए-तोयबाचा दहशतवादी सैफुल्ला खालिदचा पाकिस्तानच्या सिंधमध्ये ‘गेम’
पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर, दहशतवाद्यांच्या उपस्थितीची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलांनी जम्मू आणि काश्मीरसह अनेक राज्यांमध्ये व्यापक शोध मोहीम सुरू केली आहे. २२ एप्रिल रोजी, जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी पर्यटकांवर गोळीबार केला. सुरक्षा अधिकाऱ्यांनी गुन्हेगारांची ओळख पटवली असली तरी, ते अद्याप फरार आहेत. यासंबंधी अजूनही शोध मोहीम सुरू आहे.
