भारतावर अनेक दहशतवादी हल्ल्यांचे कट रचल्याचा आरोप असलेला लष्कर-ए-तोयबाचा (LeT) खतरनाक दहशतवादी सैफुल्ला खालिद याला पाकिस्तानमधील सिंध प्रांतात ठार करण्यात आले आहे, अशी माहिती सूत्रांनी इंडिया टुडे टीव्हीला रविवारी दिली. त्याच्यावर काही अज्ञात हल्लेखोरांनी हल्ला केला.
खालिद ३ मोठ्या दहशतवादी हल्ल्यांचा मुख्य कटकर्ता होता. त्याच्या मार्गदर्शनाखाली २००५ मध्ये बंगलोरमध्ये झालेला इंडियन सायन्स काँग्रेस (ISC) हल्ला, २००६ मध्ये नागपूर येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) मुख्यालयावर झालेला हल्ला, २००८ मध्ये रामपूर येथील CRPF कॅम्पवर झालेला हल्ला असे हल्ले झालेले आहेत. या तिन्ही हल्ल्यांमध्ये अनेक निरपराध लोकांचा मृत्यू झाला होता, आणि यामुळे भारतीय भूमीवर लष्कर-ए-तोयबाच्या कारवायांमध्ये मोठी वाढ झाली होती.
‘विनोद कुमार’ या बनावट नावाने काम
सैफुल्ला खालिद ‘विनोद कुमार’ या बनावट नावाने नेपाळमध्ये अनेक वर्षे राहत होता. तिथे त्याने नगमा बानू नावाच्या स्थानिक महिलेशी लग्न केले होते. तो तिथून LeT साठी काम करत होता. तो भरती आणि दहशतवादासाठी लागणाऱ्या साहित्याच्या पुरवठ्याचे काम पाहत होता.
पाकिस्तानात हलवले बेस
नुकतेच त्याने आपले केंद्र सिंध प्रांतातील बदीन जिल्ह्यातल्या मटली येथे हलवले. तिथे तो UN ने बंदी घातलेल्या लष्कर-ए-तोयबा आणि त्याच्या आघाडी संस्थेच्या जमात-उद-दावा साठी कार्यरत होता. त्याचे प्रमुख लक्ष भरती आणि निधी संकलन यावर होते.
हे ही वाचा:
जन औषधी केंद्र ठरतेय जनतेसाठी वरदान
गोवा आता ‘भोगभूमी’ नाहीतर ‘योगभूमी’ आणि ‘गो-माता भूमी’
भारताच्या सागरी खाद्य निर्यातीत मोठी झेप
खालच्या पातळीवरचे राजकारण काँग्रेसला संपवणार!
दक्षिण काश्मीरमध्ये आणखी तीन LeT दहशतवादी ठार
गेल्या आठवड्यात दक्षिण काश्मीरमधील शोपियन जिल्ह्यात सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत LeT चा ‘ऑपरेशन्स कमांडर’ शाहीद कुट्टे यासह आणखी तीन दहशतवादी ठार झाले.
ठार झालेल्या इतर दोन दहशतवाद्यांमध्ये, अदनान शफी (शोपियनच्या वंदुना मेल्हुरा भागातील रहिवासी) अहसन उल हक शेख (शेजारच्या पुलवामा जिल्ह्यातील मुर्रन भागाचा रहिवासी) यांचा समावेश होता. चकमकीच्या ठिकाणी सुरक्षा दलांनी AK सिरीज रायफल्स, मोठ्या प्रमाणात दारुगोळा, ग्रेनेड आणि युद्धासाठी लागणारे साहित्य जप्त केले.
LeT चा ‘ऑपरेशन्स कमांडर’
शाहीद कुट्टे हा दक्षिण काश्मीरमधील लष्कर-ए-तोयबाचा ऑपरेशन्स कमांडर होता. तो काश्मीरमध्ये दहशतवादी भरतीसाठी जबाबदार होता आणि अनेक तरुणांना फसवून त्यांना दहशतवादी मार्गावर नेले, तसेच अनेक निरपराध लोकांचा बळी घेतला.
