”ऑपरेशन सिंदूर”च्या यशानंतर आज (१८ मे) दिल्लीच्या तुघलकाबाद विधानसभा मतदारसंघातील लाल कुआं परिसरात भव्य तिरंगा यात्रा आयोजित करण्यात आली होती. पाकिस्तानी भूमीवरील दहशतवादी तळ उद्ध्वस्त करून भारतीय लष्कराची क्षमता दाखवणाऱ्या शूर सैनिकांच्या सन्मानार्थ ही तिरंगा यात्रा काढण्यात आली होती. या यात्रेचे नेतृत्व दक्षिण दिल्लीतील माजी भाजप खासदार रमेश बिधुरी यांनी केले होते.
बाजार चौकातून सुरू झालेल्या या तिरंगा यात्रेत स्थानिक नागरिक, युवक, महिला संघटना आणि भाजप कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. हातात तिरंगा धरून लोकांनी ‘भारत माता कि जय’च्या घोषणा दिल्या. यात्रेदरम्यान उपस्थितांना संबोधित करताना माजी खासदार रमेश बिधुरी म्हणाले, “पाकिस्तान हा दहशतवाद्यांना पाठिंबा देणारा देश आहे, पण तो विसरतो की हा एक नवीन भारत आहे. भारत आता इशारा देत नाहीतर तर थेट प्रहार करतो. पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली देशाने उचललेली धाडसी पावले मागील सरकारांमध्ये अशक्य मानली जात होती. ऑपरेशन सिंदूर हे याचा जिवंत पुरावा आहे.”
हे ही वाचा :
वाराणसीत पाकिस्तान व तुर्कीच्या विरोधात शवयात्रा
जन औषधी केंद्र ठरतेय जनतेसाठी वरदान
आता देशात प्रत्येक पंचायतीत ‘पैक्स’ची स्थापना
नवनीत राणा यांनी पाकिस्तानला काय दिला इशारा
रमेश बिधुरी पुढे म्हणाले, ही तिरंगा यात्रा केवळ एक कार्यक्रम नाही तर भारताच्या शौर्य, दृढनिश्चय आणि राष्ट्रीय एकतेचे प्रतीक आहे. हे आपल्या सैनिकांप्रती असलेल्या कृतज्ञतेचे आणि देशाप्रती असलेल्या आपल्या वचनबद्धतेचे सार्वजनिक प्रदर्शन आहे. दरम्यान, भारतीय सैनिकांच्या स्मरनार्थ देशभारत तिरंगा यात्रा काढण्यात येत आहे. आज राज्यातील अनेक ठिकाणी महायुतीच्या नेत्यांकडून तिरंगा यात्रा काढण्यात आली. नगपुरच्या खापरखेडा येथे काढण्यात आलेल्या तिरंगा यात्रेत मुख्यमंत्री फडणवीस उपस्थित होते.
