30 C
Mumbai
Thursday, May 9, 2024
घरक्राईमनामाभिंद्रनवालेप्रमाणे दिसण्यासाठी अमृतपालने केली होती शस्त्रक्रिया

भिंद्रनवालेप्रमाणे दिसण्यासाठी अमृतपालने केली होती शस्त्रक्रिया

गुप्तचर संघटनेतील सूत्रांना अमृतपालच्या सहकाऱ्यांकडून मिळाली माहिती

Google News Follow

Related

सध्या पंजाब पोलिस ज्याच्या मागावर आहेत तो खलिस्तानी समर्थक अमृतपालसिंग याने खलिस्तानी नेते भिंद्रनवाले यांच्यासारखे दिसण्यासाठी शस्त्रक्रिया केल्याचे समोर येते आहे.

२०२२मध्ये अमृतपालसिंग हा भारतात आला पण येण्यापूर्वी त्याने आपल्या डोळ्यावर शस्त्रक्रिया केली. जॉर्जिया येथे  त्याच्या डोळ्यावर ही शस्त्रक्रिया झाली, अशी माहिती भारतीय गुप्तचर विभागातील सूत्रांनी दिली आहे. अमृतपालचे सहकारी सध्या तुरुंगात आहेत आणि त्यांच्याकडून ही माहिती सूत्रांना मिळाली आहे.

अमृतपालच्या या सहकाऱ्यांनी सांगितले की, अमृतपाल हा दोन महिने जॉर्जियाला होता. २० जून २०२२ ते १९ ऑगस्ट २०२२ या कालावधीत त्याने ही शस्त्रक्रिया केली.

पंजाब पोलिस हे गेले अनेक दिवस अमृतपालच्या मागावर आहेत. पण तो चकमा देऊन फरार झाला आहे. तेव्हापासून वेगवेगळ्या व्हीडिओतून तो कुठेतरी आढळल्याचे दाखविले जात आहे. मात्र त्याचा ठावठिकाणा सापडू शकलेला नाही.

हे ही वाचा:

नरेंद्र मोदींवर विश्वास व्यक्त करत आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री किरण कुमार भाजपात

ठाकरे सरकारच्या भ्रष्टाचाराचे स्मारक आज उद्धवस्त झाले

गच्चीवरील पाण्याच्या टाकीवरून कामगार कोसळला

ज्येष्ठ नागरिकाने आत्महत्या करण्यापूर्वी केला पत्नीवर प्राणघातक हल्ला

जेव्हा त्याच्या अटकेसाठी पोलिसांचे मोठे पथक निघाले तेव्हा त्यांना चुकवून तो फरार झाला. त्याचे रोमहर्षक वर्णन सगळीकडे प्रसिद्ध झाले पण एवढ्या मोठ्या संख्येने पोलिस त्याच्या मागे असतानाही तो कसा काय पळाला याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे. पंजाब उच्च न्यायालयानेही पोलिसांवर याप्रकरणी ताशेरे ओढलेले आहेत.

अमृतपालसिंग हा वारिस पंजाब दे या संघटनेचा प्रमुख आहे. जर्नेल सिंग भिंद्रनवाले या खलिस्तानी नेत्याप्रमाणे बनण्याचा त्याचा प्रयत्न आहे. त्यातूनच त्याने ही शस्त्रक्रिया केली आहे.

जर्नेलसिंग भिंद्रनवाले याची हत्या ६ जून १९८४मध्ये झाली होती. ऑपरेशन ब्लू स्टारच्या माध्यमातून त्याला भारतीय लष्कराने ठार केले होते.

 

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
151,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा