मुंबई लोकलमधून एका तरुणीला बाहेर फेकल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेनंतर महिला डब्यातील प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. पनवेल- सीएसएमटी रेल्वे रुळावर एका मुलीला चालत्या रेल्वेतून बाहेर फेकल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. रेल्वे पोलिसांनी आरोपीला अटक केल्याची माहिती समोर आली आहे.
लोकलच्या महिला डब्ब्यात एक पुरुष चढला होता. या पुरुषाला खाली उतरण्याची विनंती करणाऱ्या महिलेसोबत संबंधित पुरुषाने वाद घातला. त्या वादात या पुरुषाने महिलेला चालत्या लोकलमधून खाली फेकले. पनवेल- सीएसएमटी लोकलमध्ये ५० वर्षीय पुरुष प्रवासी चढला होता. ही मुलगी जखमी झाली असून तिच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेतील आरोपी शेख अख्तर नवाजला जीआरपी पोलिसांनी अटक केली आहे.
१८ डिसेंबर रोजी एका मुलीला चालत्या लोकलमधून बाहेर फेकल्याची घटना घडली. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. या घटनेवेळी काही सतर्क रेल्वे प्रवाशांनी महिला डब्ब्यातून संबंधित आरोपी पुरुषाला चोप देत बाहेर काढले आणि त्याला पोलिसांच्या ताब्यात दिले. त्यानंतर पोलिसांनी आरोपीला न्यायालयासमोर हजर केले तिथे त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.
हे ही वाचा:
वर्तमानपत्रांच्या कार्यालयांना आग का लावली, आमचा गुन्हा काय?
सहा वर्षांच्या मुलाला कचऱ्याच्या ढिगाऱ्यात सापडली चिनी बनावटीची शस्त्र दुर्बिण!
आमिषाने रशियन सैन्यात भरती झालेले २६ भारतीय मृत्युमुखी
“कायदा- सुव्यवस्था राखण्यात युनूस सरकार अपयशी”
महिला डब्ब्यात चढणाऱ्या नवाजला खाली उतरण्यास सांगितल्याचा राग आला. या रागाच्याभरात त्याने त्याच्या समोर एक तरूणी उभी होती तिला चालत्या रेल्वेतून धक्का देत खाली ढकलले. ती तरुणी रेल्वे रुळावर पडली होती. या जखमी अवस्थेत तिने तिच्या वडिलांना कॉल करून संबंधित घटना सांगत ती कुठे पडली आहे हे सांगितले. त्यानंतर कुटुंबाने तिला शोधून रुग्णालयात उपचारासाठी नेले.







