26.4 C
Mumbai
Wednesday, June 24, 2026
घरक्राईमनामाएमबीबीएस प्रवेशाचे आमिष दाखवून ४२ लाख लुटले

एमबीबीएस प्रवेशाचे आमिष दाखवून ४२ लाख लुटले

१२ वर्षांपासून फरार असलेला सराईत गुन्हेगार जेरबंद

Google News Follow

Related

वैद्यकीय शिक्षण (एमबीबीएस) प्रवेशाचे आमिष दाखवून पालकांची लाखो रुपयांनी फसवणूक करणाऱ्या एका सराईत गुन्हेगाराला सर जे.जे. मार्ग पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. आरोपी गेल्या १२ वर्षांपासून पाच राज्यांत अनेक गुन्ह्यांत हवा होता, तर जळगाव न्यायालयाने त्याला ‘फरार’ घोषित केले होते. सहा महिन्यांच्या अथक प्रयत्नांनंतर पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त माहितीच्या आधारे त्याला अखेर अटक केली.

विष्णू रत्न गुडकर (५३) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपीने त्यांच्या मुलाला ठाण्यातील राजीव गांधी मेडिकल कॉलेजमध्ये एमबीबीएसला प्रवेश मिळवून देण्याचे आश्वासन दिले होते. या बदल्यात त्याने गुडकर यांच्याकडून ४२ लाख रुपये उकळले. मात्र, प्रवेश न मिळाल्याने आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी सर जे.जे. मार्ग पोलीस ठाण्यात धाव घेतली.

हे ही वाचा:

लखनऊमध्ये आग दुर्घटनेत कोचिंग सेंटरमधील १५ विद्यार्थ्यांचा मृत्यू

युएईला हवे ब्रह्मोस आणि आकाशतीर? संरक्षण क्षेत्रात मोठ्या कराराची चर्चा

सामाजिक कार्यकर्त्या नाझिया इलाही खान यांना गळा चिरण्याची धमकी

झेल सुटले, सामना हातातून गेला!

पोलिस उपनिरीक्षक प्रशांत नेरकर आणि त्यांच्या पथकाने या प्रकरणाचा तपास सुरू केला असता, आरोपी हा सराईत गुन्हेगार असल्याचे समोर आले. आरोपीला पकडण्यासाठी पोलीस पथकाने गुजरात, राजस्थान, लोणावळा आणि महाबळेश्वर येथे शोध घेतला. मात्र, तो सातत्याने जागा बदलत होता. दरम्यान, उत्तराखंड पोलीसही त्याच्या मागावर असल्याचे समजताच तो महाबळेश्वर सोडून मुंबईतील आग्रीपाडा भागात एका इमारतीत लपून बसला होता.

मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, पीएसआय नेरकर आणि त्यांच्या पथकाने सहा तास सापळा रचला. पोलिसांना ओळखू येऊ नये म्हणून त्यांनी विविध वेषांतर केले होते. अखेर, आग्रीपाडा येथील इमारतीतून अबीद युसूफ अन्सारी (५१, रा. नागपाडा) याला पोलिसांनी शिताफीने अटक केली.
१८ ते २० गुन्ह्यांत हवा होता आरोपी अन्सारी याच्यावर यापूर्वीही नागपाडा (२००९), जळगाव (२०१४) आणि आग्रीपाडा (२०१५) पोलीस ठाण्यात फसवणूक आणि बनावटगिरीचे गुन्हे दाखल आहेत.

तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे की, अन्सारी मुंबईसह महाराष्ट्र, गुजरात, दिल्ली, उत्तराखंड आणि मध्यप्रदेश अशा विविध राज्यांत किमान १८ ते २० गुन्ह्यांत हवा होता. त्याने अशाच प्रकारे अनेकांना गंडा घातल्याचा संशय असून, पोलीस आता सर्व संबंधित यंत्रणांशी माहिती शेअर करत आहेत.

ही कारवाई झोन-१ आणि डोंगरी विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय प्रशांत नेरकर, हेड कॉन्स्टेबल तडवी, गाडगे, पोलीस कॉन्स्टेबल शेवरे, चौधरी, पठाण आणि तांत्रिक तज्ज्ञ सचिन पाटील यांच्या पथकाने यशस्वी केली.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
317,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा