29 C
Mumbai
Wednesday, April 22, 2026
घरक्राईमनामादहशतवादी कट उधळला! गुजरात एटीएसची कारवाई; मुंबईतही अटक

दहशतवादी कट उधळला! गुजरात एटीएसची कारवाई; मुंबईतही अटक

भाजप नेते, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पदाधिकाऱ्यांना लक्ष्य करण्याची योजना

Google News Follow

Related

गुजरात दहशतवाद विरोधी पथकाने (ATS) देशात मोठा दहशतवादी कट रचणाऱ्या दोघांना अटक करत मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत एक आरोपी गुजरातमधून, तर दुसऱ्याला मुंबईतील साकीनाका परिसरातून ताब्यात घेण्यात आले.

अटक करण्यात आलेल्या आरोपींची ओळख इरफान पठाण (२२, सिद्धपूर, जि. पाटण) आणि मुर्शिद शेख (२१) अशी आहे. मुर्शिद हा मूळचा बिहारचा रहिवासी असून मुंबईतून त्याला अटक करण्यात आली.

आरोपीचे केमिस्ट्रीत शिक्षण

टीएसच्या तपासात धक्कादायक बाब समोर आली आहे. इरफान हा केमिस्ट्री विषयात एमएससी शिक्षण घेतलेला असूनही सोशल मीडियाच्या माध्यमातून कट्टर विचारसरणीकडे वळला. पुढे तो पूर्णपणे कट्टर बनला आणि भारतात ISISसारखी संघटना उभारण्याचा त्याचा मानस असल्याचे उघड झाले आहे.

हे ही वाचा:

“या अपघाताचे सत्य बाहेर येईपर्यंत मी शांत बसणार नाही.”

आझाद, रुबिनाने गळा चिरून मारले शेजाऱ्याला

बुमराहला पहिली ओव्हर देण्याचा हार्दिकचा ‘मास्टरस्ट्रोक

त्रिशूरमध्ये भीषण स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक जखमी

दुसरा आरोपी मुर्शिद हा नववीपर्यंत शिक्षित असून तोही सोशल मीडियाद्वारे या जाळ्यात ओढला गेला. दोघांमध्ये गेल्या ५-६ महिन्यांपासून सातत्याने संपर्क होता आणि ते एकत्रितपणे मोठा कट रचत असल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे.

तपासादरम्यान या दोघांनी भाजप नेते आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पदाधिकाऱ्यांना लक्ष्य करण्याची योजना आखल्याची माहिती समोर आली आहे. तसेच शस्त्रास्त्रे मिळवण्याच्या हालचालीही सुरू असल्याचे चॅटमधून उघड झाले.
ATS ने जप्त केलेल्या मोबाईल चॅट्समध्ये व्हॉट्सअ‍ॅप आणि टेलिग्रामवर अनेक गट चालवले जात असल्याचे आढळले. या गटांद्वारे द्वेषपूर्ण संदेश पसरवणे आणि बेकायदेशीर कारवायांबाबत चर्चा केली जात होती.
तपासात काही चॅटमध्ये इतर धर्मीयांविषयी आक्षेपार्ह शब्दांचा वापर करत द्वेष पसरवला जात असल्याचेही उघड झाले आहे. ATSच्या मते, या सर्व पुराव्यांमधून आरोपींचा देशविरोधी हेतू स्पष्ट होत आहे.
या प्रकरणाचा अधिक तपास सुरू असून या कटात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा शोध घेतला जात आहे. कडून आरोपींची सखोल चौकशी सुरू आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
303,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा