शरयू एक्स्प्रेसमध्ये महिला कॉन्स्टेबलवर हल्ला केल्या प्रकरणातील एक आरोपी पोलिसांशी झालेल्या चकमकीत मारला गेला आहे. एसटीएफ आणि अयोध्या पोलिसांनी संयुक्तपणे राबवलेल्या या चकमकीत गुन्हेगार अनीस मारला गेला. त्याचे अन्य दोन साथीदारही यात मारले गेले. या चकमकीत तिघे पोलिस जखमी झाल्याची चर्चा आहे. या प्रकरणात इनायत नगर पोलिस ठाण्याच्या पोलिसांनी अन्य दोघा आरोपींना अटक केली आहे.
श्रावण मेळ्यादरम्यान शरयू एक्स्प्रेसमध्ये महिला कॉन्स्टेबलवर हल्ला झाला होता. या महिलेला गंभीर परिस्थितीमध्ये लखनऊ ट्रॉमा सेंटरमध्ये दाखल करण्यात आले होते. ही घटना ३१ ऑगस्ट रोजी झाली होती. या प्रकरणी न्यायालयालाही तातडीने कळवण्यात आले होते. या प्रकरणी अर्ध्या रात्री न्यायालय उघडून सुनावणी घेण्यात आली होती. या चकमकीत मारला गेलेला अनिस महिला कॉन्स्टेबलची छेड काढत होता.
हे ही वाचा:
शरद पवार, राहुल गांधींना मुस्लिम मतं हवीत; पण आम्ही नको!
छोटा राजनचा नवा अवतार, लॉरेंस बिश्नोई…
शरद पवार, राहुल गांधींना मुस्लिम मतं हवीत; पण आम्ही नको!
ओंकारेश्वरला उभी राहिली आदि शंकराचार्यांची भव्य मूर्ती !
या महिला कॉन्स्टेबलने अनिसला मारल्यावर अनिससह तिघा गुंडांनी तिच्यावर प्राणघातक हल्ला केला. रेल्वेच्या खिडकीवर तिचे डोके आपटून तिला जखमी करण्यात आले होते. या हल्ला करणाऱ्यांपैकी एकाला यूपी एसटीएफ आणि अयोध्या पोलिसांनी चकमकीत ठार केले आहे.







