29.2 C
Mumbai
Saturday, June 27, 2026
घरक्राईमनामामहिलेच्या कारमध्ये घुसून, चाकूचा धाक दाखवून लुटण्याचा प्रयत्न

महिलेच्या कारमध्ये घुसून, चाकूचा धाक दाखवून लुटण्याचा प्रयत्न

महिलेच्या प्रसंगावधानामुळे आणि सतर्क नागरिकांमुळे आरोपी जेरबंद

Google News Follow

Related

फुटबॉल क्लासमधून मुलांना घेऊन घरी परतणाऱ्या एका महिलेच्या कारमध्ये घुसून, चाकूचा धाक दाखवून लुटण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना बुधवारी सायंकाळी मुंबईत घडली. कारमध्ये मुले असतानाही जिद्दीने सामना करणाऱ्या मातेच्या प्रसंगावधानामुळे आणि मदतीला धावून आलेल्या स्थानिक नागरिकांच्या सतर्कतेमुळे आरोपी जेरबंद झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी सायंकाळी सातच्या सुमारास ही घटना घडली. ख्रिस्ता/डॉन बॉस्को परिसराजवळ एका महिलेने आपल्या दोन मुलांना फुटबॉल क्लासमधून घेतले होते. त्या कारमध्ये बसत असतानाच, अचानक एका इसमाने कारचा मागील दरवाजा उघडून आत प्रवेश केला. कारमध्ये मागे मुले बसलेली असतानाही, या आरोपीने चाकूचा धाक दाखवत महिलेकडे पैशांची मागणी केली आणि आरडाओरडा न करण्याची धमकी दिली. अशा बिकट परिस्थितीतही डगमगून न जाता, महिलेने प्रसंगावधान राखत आरडाओरडा करून प्रतिकार केला. महिलेच्या आक्रमक पवित्रा पाहून आरोपी गडबडला आणि कारमधून पळून जाण्याचा प्रयत्न करू लागला. मात्र, महिलेच्या ओरडण्याचा आवाज ऐकताच परिसरातील नागरिक मदतीसाठी धावून आले. त्यांनी आरोपीला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले.

हे ही वाचा:

ऍपलचा दणका! मॅकबुक, आयपॅडच्या किंमतीत १ लाख रुपयांपर्यंत वाढ

आम्ही युद्धात नव्हतो! अमेरिका-इराण संघर्षावरून मेलोनींनी नाटोला सुनावले

पियुष गोयल यांना Exceptional Leadership in Elevating UK-India Ties पुरस्कार

ओमानजवळ जहाजावर हल्ला; होर्मुझमधील स्थलांतर मोहीम तात्पुरती स्थगित

पोलिसांनी आरोपीची झडती घेतली असता, त्याच्याकडे दोन चाकू सापडले आहेत. आरोपीचे नाव अली वसरत अली सय्यद असून, तो व्यवसायाने चालक असल्याचे समजते. याप्रकरणी पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १२६(२), ३०९(२), ३०९(५) आणि ६२ अंतर्गत दरोड्याचा प्रयत्न आणि चुकीच्या पद्धतीने प्रतिबंध केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. न्यायालयात हजर केले असता, आरोपीला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या गुन्ह्यामागील नेमके कारण काय आणि आरोपीचा काही गुन्हेगारी इतिहास आहे का, याचा तपास सध्या पोलीस करत आहेत.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
318,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा