24 C
Mumbai
Tuesday, December 9, 2025
घरक्राईमनामावादग्रस्त व्यावसायिक अविनाश भोसले यांना सीबीआयकडून अटक

वादग्रस्त व्यावसायिक अविनाश भोसले यांना सीबीआयकडून अटक

Google News Follow

Related

पुण्यातील प्रसिद्ध व्यवसायीक अविनाश भोसले यांना सीबीआयने अटक केली आहे. डीएचएफएल प्रकरणात ही अटक करण्यात आली आहे. अविनाश भोसले इन्फ्रास्ट्रक्चर लि. या पुण्यातील ग्रुपचे ते संस्थापक आहेत. यापूर्वी भोसले यांची ईडीकडून फेमा कायदा अंतर्गत चौकशी करण्यात आलेली होती.

अविनाश भोसले हे पुण्यातील प्रसिद्ध व्यवसायिक असून पतंगराव कदम यांचा मुलगा विश्वजित कदम यांचे सासरे आहेत. ऑगस्टमध्ये त्यांची ४ कोटींची संपत्ती ईडीने जप्त केली होती.

डीएचएफएल प्रकरणात सीबीआयने काही दिवसापूर्वी भोसले यांच्या घरी छापे टाकले होते. त्यानंतर गुरुवारी अविनाश भोसले यांना अटक करण्यात आली असल्याची माहिती सीबीआयच्या सूत्रांनी दिली आहे.

पुणे पोलिसांनी भोसले यांच्याविरोधात एफआयआर दाखल केला होता. त्यांच्यावर मनी लॉन्ड्रिंगचा आरोप आहे. यशवंत घाडगे नगर येथे असलेल्या जागेसंदर्भात हा एफआयआर करण्यात आला आहे. येस बँकेच्या संस्थापक राणा कपूर आणि कपिल वाधवा यांच्याविरोधातील प्रकरणात भोसले यांना २०२०मध्ये अटक करण्यात आली होती. कपूर आणि वाधवा यांनी डीएचएफएल कंपनीला येस बँकेच्या माध्यमातून कर्ज देण्याचा निर्णय घेताना स्वतःच्या लाभाचा विचार केला होता.

हे ही वाचा:

मोदी सरकारचे आठ वर्षात,आठ मोठे निर्णय

ही तर रिसॉर्टमधील सांडपाण्यावरून ईडीने केलेली चौकशी!

अनिल परबांचे निकटवर्तीय संजय कदम यांच्याकडेही ईडी

भाजपा राज्यसभेची तिसरी जागा लढवून जिंकू शकते

 

येस बँक आणि डीएचएफएल यांच्यातील घोटाळा २०१८ एप्रिल – जूनदरम्यान उघड झाला होता. त्यावेळी येस बँकेने डीएचएफलमध्ये ३७०० कोटींची गुंतवणूक केली होती. त्यावेळी वाधवाने कपूरला ६०० कोटींची लाच दिली होती.

या प्रकरणात मुंबईतील बांधकाम व्यवसायीक  संजय छाब्रिया यांनाही अटक करण्यात आली होती,त्यानंतर अविनाश भोसले , विनोद गोयंका आणि शाहीद बलवा हे सीबीआयच्या रडारवर होते अशी माहिती सीबीआयच्या सुत्रांनी दिली आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
284,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा