27 C
Mumbai
Wednesday, June 22, 2022
घरक्राईमनामाअनिल परबांचे निकटवर्तीय संजय कदम यांच्याकडेही ईडी

अनिल परबांचे निकटवर्तीय संजय कदम यांच्याकडेही ईडी

Related

गुरुवारी, २६ मे रोजी ईडीने महाराष्ट्राचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्या घरावर धाड टाकली होती. परबांच्या शासकीय निवासस्थानासोबत त्यांच्याशी संबंधित सात ठिकाणावर छापे टाकण्यात आले आहेत. त्यानंतर अनिल परब यांचे निकटवर्तीय संजय कदम यांच्या घरीही ईडीने छापा टाकला आहे.

संजय कदम हे अनिल परब यांचे निकटवर्तीय समजले जातात. संजय कदम हे अंधेरी पश्चिम शिवसेना विभाग संघटक आहेत. संजय कदम यांच्या घरी सकाळी साडेसहा वाजल्यापासून ईडीकडून छापेमारी सुरू आहे. ईडीकडून कारवाई सुरू असल्याची माहिती मिळताच संजय कदम यांच्या घराबाहेर मोठ्या प्रमाणावर शिवसैनिक जमा होऊ लागले आहेत. तसेच अनिल परबांच्या घरभर देखील शिवसैनिक जमा झाले आहेत.

यापूर्वी महिनाभरापूर्वी संजय कदम यांच्या घरी आयकर विभागाने छापेमारी केली होती. या छापेमारीत आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी संजय कदम यांच्या घरातून काही महत्त्वाचे कागदपत्रे जप्त केली होती. तसेच परब यांच्या सीएच्या घरीसुद्धा आयकर विभागाने छापेमारी केली होती. यावेळी महत्त्वाचे कागदपत्रे जप्त करण्यात आले होते.

हे ही वाचा:

सचिन वाझे देणार अनिल देशमुखांविरोधात साक्ष

अनिल परब जेलमध्ये जाणारच

भाजपा राज्यसभेची तिसरी जागा लढवून जिंकू शकते

पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार भारतातील सगळ्यात मोठ्या ड्रोन महोत्सवाचे उदघाटन

दरम्यान, अनिल परब यांच्याविरोधात ईडीकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अनिल परब यांच्यासंबंधित ७ जागांवर ईडीने छापेमारी केली आहे . गेल्या ११ तासापासून ही छापेमारी सुरु आहे. अनिल परब यांच्यावर मनी लाँड्रिंग प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दापोलीतील रिसॉर्ट आणि पोलिसांच्या बदल्यांमध्ये झालेला घोटाळा या प्रकरणी ईडी चौकशी करत आहे. तसेच ५ ते ६ प्रकरणांवर त्यांची चौकशीसुद्धा सुरु आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,938चाहतेआवड दर्शवा
1,920अनुयायीअनुकरण करा
10,300सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा