दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या सायबर सेलने घुसखोर बांगलादेशींविरुद्ध मोठी कारवाई केली आहे. शोधमोहिमे दरम्यान तीन बेकायदेशीर बांगलादेशी स्थलांतरितांना पोलिसांनी अटक केली आहे. विशेष म्हणजे, अटक करण्यात आलेले घुसखोर बांगलादेशी दिल्लीतील बवाना येथे प्रॉपर्टी डीलर म्हणून काम करत होते. यांच्याकडून बनावट जन्म प्रमाणपत्र आणि इतर बनावट कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत.