पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या नूतनीकृत संकुलात तयार करण्यात आलेल्या नवीन ध्वनीमुद्रण व ध्वनिरोपण कक्ष, आभासी चित्रीकरण कक्ष, संकलन कक्ष आणि पूर्व- परिक्षण तसेच प्रशिक्षण दालन या संकुलाचे नामकरण ‘स्वरगंधर्व सुधीर फडके दृक-श्राव्य संकुल’ असे करण्यात आले आहे. आज श्रीधर फडके यांच्या हस्ते त्याचे लोकार्पण करण्यात आले.
सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमाला सांस्कृतिक विभागाचे अप्पर मुख्य सचिव विकास खारगे यांच्यासह अकादमीच्या संचालिका मिनल जोगळेकर, दिग्दर्शक कुमार सोहनी, पुरुषोत्तम बेर्डे, गायिका उत्तरा केळकर, राणी वर्मा, उपेंद्र भट यांच्यासह कला क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.
हेही वाचा..
भाजपाच्या प्रयोगशाळेत, काँग्रेसचा प्रयोग…
तहव्वूर राणाच्या प्रत्यार्पणाबद्दल भारतातील इस्रायलचे राजदूत काय म्हणाले?
गृहमंत्री शाह रायगड दौऱ्यावर, सुनील तटकरेंच्या निवासस्थानी करणार भोजन!
पश्चिम बंगाल: मंताज हुसेनकडून ११ वर्षीय हिंदू मुलीवर बलात्कार!
यावेळी सुधीर फडके यांच्या अजरामर गीतांचा कार्यक्रम सादर करण्यात आला ज्यामध्ये स्वतः श्रीधर फडके यांनी सुधीर फडके यांनी संगीतबद्ध केलेले गाणे सादर केले. तर केतकी भावे जोशी, अभिषेक नलावडे, सोनाली कर्णिक, प्रशांत लळीत, कुणाल रेगे आणि अजित परब यांनी सुधीर फडके यांची निवडक गाणी सादर केली.
यावेळी सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार म्हणाले की, आज आनंद होत आहे कारण आपण शासनातर्फे बापूजींची स्मृती या ठिकाणी टिकवू शकलो या संकुलाला काय नाव द्यावं असा प्रश्न आला तेव्हा मी अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली तेव्हा सुधीर फडके यांचे नाव देऊया अशी कल्पना पुढे आली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बैठकीत होतो तेव्हा मी विषय काढला की संकुलाचे नाव द्यायचे आहे..मुख्यमंत्री यांनी विचारलं की काय आहे नेमक तिथे मी सर्व सांगितले तेव्हा ते म्हणे की, सुधीर फडके यांचे नाव देता येते का बघा.. आणि त्यामुळे आम्ही त्यांचे नाव देण्याचा निर्णय घेऊन आज त्यांच्या नावाचे संकुल उभे राहिले आहे. केवळ सरकार नाही हे संकुल सर्वांसाठी खुले असेल ते ही कमी शुल्कात. आम्ही मराठी माध्यमाच्या शाळांमध्ये शिकलो त्यावेळी शाळेत आम्ही बाबुजींची गाणी प्रार्थना म्हणून गायली आहेत. आज जे मराठीवर आंदोलन करणाऱ्यांची किती मुले मराठी शाळेत आहेत माहिती नाही.. असा टोलाही त्यांनी लगावला. या कार्यक्रमात सांस्कृतिक विभागाचे अप्पर मुख्य सचिव विकास खारगे यांनी केलेले बासरी वादन ही लक्षवेधी ठरले.