27 C
Mumbai
Tuesday, September 27, 2022
घरक्राईमनामासिद्धू मूसेवाला हत्येप्रकरणी बिश्नोईच्या भाच्याला अटक

सिद्धू मूसेवाला हत्येप्रकरणी बिश्नोईच्या भाच्याला अटक

Related

पंजाबी गायक सिद्धु मूसेवाला यांची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी महत्त्वाची माहिती समोर आली आहे. या हत्याकंडाचा मास्टरमाइंड लॉरेन्स बिश्नोईच्या भाच्याला अटक करण्यात आली आहे. सचिन असे बिश्नोईच्या भाच्याचे नाव असून तो या हत्याकांडाचा मास्टरमाइंड असल्याचे बोलले जात आहे.

मास्टरमाइंड सचिन बिश्नोई याला अझरबैजानमधून ताब्यात घेण्यात आले आहे. बिश्नोई हा कुख्यात लॉरेन्स बिश्नोई टोळीत सामील असलेला एक गुंड असून त्याने सिद्धू मुसेवाला यांच्या हत्येची जबाबदारी स्वीकारली होती.

सचिन बिश्नोईच्या नावाचा बनावट पासपोर्ट दिल्लीमधील संगम विहार भागातल्या एका पत्त्यावर बनवण्यात आला होता. या बनावट पासपोर्टमध्ये त्याचे नाव टिळक राज टुटेजा आणि वडिलांचे नाव भीम सिंह असे लिहिले आहे. तर हत्याकांडाच्या सुमारे महिनाभर आधी २१ एप्रिलनंतर तो या बनावट पासपोर्टद्वारे दुबईला पळून गेला होता. तेथून तो अझरबैजानला गेला. सध्या सुरक्षा यंत्रणांनी त्याला परदेशात ताब्यात घेतले आहे.

हे ही वाचा:

चित्रदुर्ग मठाच्या पुजाऱ्यावर लैंगिक छळाचे आरोप

वरळी नाक्याच्या बाप्पाचा रथ खेचला मुस्लिम बांधवांनी

निधी देण्यासाठी मिटकरी कमिशन मागतात, राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यांचा आरोप

लिंक क्लिक करताच ९७ हजार गमावले

पंजाब सरकारने सिद्धू मूसेवाला यांची सुरक्षा काढून घेतल्याच्या एका दिवसानंतर त्यांची हत्या करण्यात आली होती. सिद्धू मूसेवाला आणि त्याच्या साथीदारांवर ३० राऊंड गोळीबार करण्यात आला होता.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,966चाहतेआवड दर्शवा
1,942अनुयायीअनुकरण करा
40,300सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा